बीड जिल्ह्यात मारहाणीच्या घटना सुरूच; शुल्लक कारणावरून महिलेला जबर मारहाण, डोक्याला 14 टाके
बीड क्राइम न्यूज: बीड जिल्ह्यात मारहाणीच्या घटना सुरूच असून सातत्याने घडणाऱ्या घटनांनी बीड जिल्हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे? अशातच बीड शहरात एका घरासमोरील रस्त्यावरून जाऊ नको, म्हणत शुल्लक कारणावरून बीडच्या अंजनवती गावातल्या एका महिलेला गंभीर मारहाण झालीय. या मारहाणीत प्रियंका गाढवे या महिलेच्या डोक्याला शेतीच्या अवजाराने खोलवर जखम झालीहे. ज्यात महिलेच्या डोक्याला चक्क 14 टाके पडले आहेत.
Beed Crime : महिलेच्या डोक्याला चक्क 14 टाके
मिळालेल्या माहितीनुसारमागील आठवड्याभरापूर्वी याच अंजनवती गावात शेतीच्या वादातून एका महिलेला भावकीतील काही जणांनी मारहाण केली होती. ही घटना ताजी असतानाच याच गावात महिलेला मारहाण झाल्याचा हा दुसरा प्रकार समोर आलाय. जखमी महिलेवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांकडून महिलेची प्रकृती स्थिर झाल्यानंतर जबाब नोंदविला जाणार आहे.
Beed Crime News : चायनिज सेंटर चालविणाऱ्या एकावर धारदार शस्त्राने हल्ला
तर दुसरीकडे बीडच्या केजमध्ये देखील अशीच एक गंभीर कार्यक्रम घडली आहे. चायनिज सेंटर चालविणाऱ्या एकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे? यात जखमीवर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. केज येथे बस स्टँडसमोर चायनिज सेंटर चालवित असलेल्या सय्यद इर्शाद याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. चार ते पाच जणांनी हल्ला केल्याने चायनीज सेंटर चालक सय्यद इर्शाद हे गंभीर जखमी झाले. केज उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ गशासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सय्यद अर्शद यांचा जवाब घेतल्यानंतर या प्रकरणी आज केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.