पक्षाकडे लक्ष द्या, तुमच्या कामाचे मूल्यांकन सुरू; प्रदेशाध्यक्षांकडून भाजपच्या मंत्र्यांना समज
भाजपची बैठक: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपमध्ये पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनी मंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ‘पक्षाकडे लक्ष द्या, तुमच्या कामाचं मूल्यांकन सुरू आहे’, असा स्पष्ट इशारा भाजप (BJP) मंत्र्यांना देण्यात आला आहे. या बैठकीत मंत्र्यांना पालकमंत्रिपद असलेल्या जिल्ह्यांमध्ये अधिक सक्रिय होण्यास सांगण्यात आले असून, पक्षांतर्गत मतभेद मिटवून निवडणुकीसाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लोकांची कामं करण्यावर भर देण्याच्या स्पष्ट सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या आहेत.
BJP Meeting: कार्यकर्त्यांच्या कामांमध्ये दिरंगाई नको
या बैठकीत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंत्र्यांवर नाराजी व्यक्त करताना म्हटले की, “अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची कामे वेळेत होत नाहीत. आपले सरकार असूनही कामे विलंबाने होत असतील तर ते योग्य नाही. प्रत्येक मंत्र्यांनी पक्षाची कामे लवकर होण्याच्या दृष्टीने व्यवस्था तयार करावी, असे आदेश त्यांनी दिले आहे.
BJP Meeting: संघाचेही योगदान वाढणार
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) वरिष्ठ पदाधिकारी आणि भाजप नेत्यांमध्ये यशवंत भवन, मुंबई येथे दुसरी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत भारतीय संस्कृती आणि हिंदुत्वाच्या मार्गाने पुढे जाण्याबाबत चिंतन करण्यात आले. संघाच्या बाजूने देण्यात आलेल्या संदेशात असे स्पष्ट करण्यात आले की, संघटनात्मक पातळीवर कार्य अधिक वाढविण्याची आवश्यकता आहे आणि कार्यकर्त्यांनी त्या दिशेने कृतीशील राहावे, असे अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
BJP Meeting: बैठकीस कोण उपस्थित?
या दोनही बैठकींना भाजप आणि संघाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. यामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, मंत्री चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांची उपस्थिती होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.