दारूला पैसे देत नसल्याने सावत्र आईचा निर्घृण खून, खलबत्त्यानं डोकं ठेचलं, डोक्याचा चेंदामेंदा उ
कोल्हापूर: दारूच्या व्यसनाच्या अधीन गेलेल्या मुलांनी आपल्या आईला संपवल्याच्या दोन (Crime News) घटना समोर आल्या आहे, एक घटना कोल्हापुरातील आहे, तर दुसरी घटना तासगावमधील आहे. दारूसाठी (Crime News) पैसे मागितले तेव्हा आईने पैसे द्यायला नकार दिल्याने निर्घृणपणे संपवलं आहे. पहिली घटना आहे कोल्हापुरातील. दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून सावत्र मुलाने स्वतःच्या आईचा खलबत्त्याने डोके ठेचून निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. १५) सकाळी साडेसहाच्या सुमारास राजेंद्रनगर येथील साळोखे पार्क परिसरातील भारतनगरमध्ये घडली. सावित्रीबाई अरुण निकम (वय ५३) असे मृत महिलेचे नाव असून, हल्लेखोर मुलगा विजय अरुण निकम (वय ३५) याला राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळावरूनच अटक केली आहे.(Crime News)
kolhapur Crime News: विजयने संतापाच्या भरात घरातील खलबत्ता उचलून
मिळालेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई निकम या महाद्वार रोड परिसरात किरकोळ वस्तूंची विक्री करून उदरनिर्वाह करत होत्या. त्यांचा सावत्र मुलगा विजय निकम हा अधूनमधून सेंट्रिंग आणि डिजिटल बोर्ड पेस्टिंगचे काम करत असे; मात्र त्याला दारूचे व्यसन लागले होते. आई-वडिलांच्या छोट्याशा पत्र्याच्या घरात तो आईसोबतच राहत होता. त्याच्या वारंवारच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी आणि दोन मुली माहेरी विजापूर येथे गेल्या होत्या. मंगळवारी रात्री आई-मुलामध्ये वाद झाला होता. बुधवारी सकाळी विजयने पुन्हा दारूसाठी पैसे मागितले. सावित्रीबाईंनी पैसे देण्यास नकार दिल्यावर विजयने संतापाच्या भरात घरातील खलबत्ता उचलून आईच्या डोक्यावर वार केला, यात तिचा जागीच मृत्यू झाला.
कोलाह क्राइम न्यूज: मी म्हणालो, मी म्हणालो
यानंतर विजयने स्वतःच इस्पूर्ली येथील बहिणीला फोन करून “आईचा खून केला” अशी माहिती दिली. परिसरातील नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले. राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केली आणि पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी रोहिणी जयवंत पोर्लेकर (वय २९, रा. इस्पूर्ली, ता. करवीर) यांनी फिर्याद दिली असून, राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
kolhapur Crime News: निर्घृणपणे डोक्याचा चेंदामेंदा केला; उंबऱ्यापर्यंत रक्ताचे ओघळ आले…
मुलाने आईवर केलेल्या अत्यंत क्रूर हल्ल्यात तिच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. घरभर रक्त सांडले होते आणि रक्ताचे ओघळ उंबऱ्यापर्यंत वाहत आले होते. हा मन सुन्न करणारा आणि हृदय पिळवटून टाकणारा प्रकार पाहून परिसरातील नागरिक स्तब्ध झाले. आईचा असा अंत पाहून सर्वजण हळहळ व्यक्त करीत होते, तर खुनी मुलाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात होता. घटनेची माहिती मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले.
kolhapur Crime News: घटनेनंतर मुलाच्या तोंडावर पश्चातापाचा लवलेश नाही
आईचा संपवून तो दारातच बसून होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र, त्याच्या चेहऱ्यावर आपल्या कृत्याच्या पश्चातापाचा लवलेशही नव्हता. नागरिकांनी मोठी गर्दी केली.
Tasgaon Crime News: दारूच्या नशेत मुलाने स्वतःच्या आईची तलवारीने भोसकून खून
तासगाव : शहरातील इंदिरानगर झोपडपट्टी भागात दारूच्या नशेत मुलाने स्वतःच्या आईचा तलवारीने भोसकून खून केल्याची हादरवून टाकणारी घटना मंगळवारी (दि. १४) रात्री उघडकीस आली आहे. मृत महिलेचे नाव शांताबाई चरण पवार (वय ७०) असून, खून करणारा मुलगा जगन चरण पवार (वय ४४) असा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शांताबाई पवार आपल्या कुटुंबासह इंदिरानगर झोपडपट्टी भागात राहत होत्या. मंगळवारी रात्री जगन हा दारूच्या नशेत घरी आला आणि किरकोळ कारणावरून आईशी वाद घालू लागला. वाद चिघळताच संतापाच्या भरात त्याने घरातील तलवार उचलून आईवर वार केला. या हल्ल्यात शांताबाई पवार गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावल्या.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांच्या मार्गदर्शनाखालील तासगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी जगन पवारला अटक केली. रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. या निघृण घटनेने तासगाव शहरासह परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत असून, तासगाव पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
आणखी वाचा
Comments are closed.