दीड कोटींची डिफेंडर कार कोणत्या कामाच्या कमिशनमधून मिळाली? भाजप नेत्याचा शिंदे गटाच्या नेत्यावर


बुलढाणा वार्ता: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधीच (Local Body Elections) बुलढाण्यात (Buldhana) महायुतीच्या (Mahayuti) दोन प्रमुख घटकांमध्ये म्हणजेच भाजप (BJP) आणि शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde Faction) चांगलीच जुंपल्याचे दिसून येत आहे. एकमेकांवर कुरघोडी करताना आता आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. विशेषत: दीड कोटींच्या लक्झरी लँड रोव्हर डिफेंडर (Land Rover Defender) कारवरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहे.

Vijay Shinde on Sanjay Gaikwad: दीड कोटींची डिफेंडर कोणत्या कामाच्या कमिशनमधून मिळाली?

भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे (Vijay Shinde) यांनी थेट शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. विजय शिंदे म्हणाले की, जर बुलढाणा नगराध्यक्ष पदासाठी भाजपचाच विचार होत असेल तरच युती शक्य आहे. बुलढाण्यात बेडकासारख भाषणातून युती पाहिजे… युती पाहिजे असं म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधीने काल दीड कोटी रुपयांची डिफेंडर आणली. ती एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर असून ती कोणत्या कामातील कमिशनमुळे या लोकप्रतिनिधीला मिळाली याची चौकशी व्हावी. मतदारांना वेश्यापेक्षा खराब म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधीला लोक नाकारतील म्हणून भाजपचाच विचार व्हावा अन्यथा युती नाही, असे त्यांनी म्हटले.

Sanjay Gaikwad on Vijay Shinde: बुलढाण्यात मोठा भाऊ मीच : संजय गायकवाड

तर आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे की, “बुलढाण्यात शिवसेना-भाजप युती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. युती होईल अशी आम्हाला आशा आहे. भाजपने अजून एकला चलो रेचा नारा दिलेला नाही. आमची अजून चर्चा झालेली नाही. जेव्हा बैठक होईल, चर्चा होईल, त्यावेळेस जर त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचं लढा आणि आम्ही आमचं लढू. तर आम्ही आमचे लढू. बुलढाण्यात मोठा भाऊ मीच आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाची युती होईल की नाही? हे भविष्यात ठरेलच, मात्र आतापासून भाजपा आणि शिंदे गटात जुंपल्याचं चित्र बुलढाण्यात दिसत आहे. आता बुलढाण्यात भाजप आणि शिंदे गटाची युती होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Gaikwad: बुलढाण्यात एक लाखांहून अधिक बोगस मतदार; मतदारयाद्यांतल्या घोळावर सत्ताधारी आमदारांचा सरकारला घरचा आहेर

Thane Crime : ठाणे महापालिकेचे लाचखोर उपायुक्त शंकर पाटोळेसह इतर दोघांना दिलासा; न्यायालयाकडून अटीशर्तीसह जामीन मंजूर

आणखी वाचा

Comments are closed.