विवाह संकेतस्थळांवर पोलिसाच्या गणवेषातील फोटो लावले; लग्नाच अमिष दाखवून अनेकांना लुटून नको ते क


रत्नागिरी: पोलिस उपनिरीक्षक असल्याचे सांगून विवाह संकेतस्थळावरील महिलाची फसवणूक (Ratnagiri Crime News) करणाऱ्या आरोपीला अटक (Ratnagiri Crime News) करण्यात आली आहे. वैभव नरकर असे या आरोपीचे असून तो मूळचा रत्नागिरीचा आहे. नरकर हा स्वत:ला पोलिस उपनिरीक्षक म्हणून भासवत होता. एका विवाह संकेतस्थळावरून त्याने महिलांना फसवले, एका महिलेसोबत बलात्कार केला आणि अनेकांकडून आर्थिक फसवणूक केल्याची माहिती देखील समोर आली आहे.(Ratnagiri Crime News)

पोलिसांच्या माहितीनुसार, नरकर याने सोशल मिडियावर आणि विवाह संकेतस्थळांवर स्वतःचे पोलीस गणवेषातील फोटो वापरून बनावट प्रोफाईल तयार केली. चेंबूर येथील ३३ वर्षीय महिलेला त्याने प्रेमाच्या जाळ्यात (Ratnagiri Crime News) ओढले आणि कोर्ट मॅरेजच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार (Ratnagiri Crime News) केला. त्यानंतर तिच्याकडून एक स्कूटर, ₹२.५ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांसह ₹३०,००० रोख उकळले. नरकरने याआधी सोलापूरच्या एका महिलेलाही अशाच प्रकारे फसवले होते. “Jeevansathi.com” वरून त्या महिलेशी ओळख करून घेतली आणि लग्नासाठी घरी येण्याचे सांगितले. काही दिवसांनी त्याने आपल्या नातलगाचा अपघात झाल्याचे सांगून ₹६३,००० मागितले. पैसे घेतल्यानंतर संबंधित महिलेला तो आधीच विवाहित असल्याचे समजले.(Ratnagiri Crime News)

Ratnagiri Crime News: जामिनावर सुटल्यावर त्याने पुन्हा फसवणूक

त्याचबरोबर नरकरने स्वत:ला मंत्रालयातील मोठ्या अधिकाऱ्याचा सहायक असल्याचे भासवून १०० हून अधिक बेरोजगार युवकांना पोलिस किंवा सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून पैसे उकळले. काहींना तर पोलिस गणवेष शिवून घेण्यास सांगितले. अनेक पीडितांनी लाज आणि सामाजिक अपमानाच्या भीतीने तक्रार दाखल केलेली नाही. नरकर याला रत्नागिरी पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवून अटक केली होती. जामिनावर सुटल्यावर त्याने पुन्हा फसवणूक सुरू केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तो ‘सराईत फसवणूक करणारा’ असून, भावनिक आणि सामाजिक विश्वास संपादन करून लोकांची आर्थिक, मानसिक आणि लैंगिक पातळीवर फसवणूक करतो.

Ratnagiri Crime News: सोशल मिडियावर आणि विवाह संकेतस्थळांवर पोलीस गणवेषातील फोटो

त्याने पकडले जाऊ नये यासाठी सोशल मिडियावर आणि विवाह संकेतस्थळांवर स्वतःचे पोलीस गणवेषातील फोटो वापरून बनावट प्रोफाईल तयार केली. याद्वारे लोकांना तो पोलिस असल्याचे भासवून त्यांची फसवणूक करत होता, त्याचबरोबर त्याने स्वत:ला मंत्रालयातील मोठ्या अधिकाऱ्याचा सहायक असल्याचे भासवून १०० हून अधिक बेरोजगार युवकांना पोलिस किंवा सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून पैसे उकळले. काहींना तर पोलिस गणवेष शिवून घेण्यास सांगितले.

आणखी वाचा

Comments are closed.