मतचोरी होत असल्याचा मला अनुभव, विरोधकांचा आरोप सत्य, राज ठाकरेंच्या भूमिकेशी महादेव जानकर सहमत


महादेव जानकर: देशात मतचोरी होत आहे याचा मला अनुभव आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या भूमिकेशी मी सहमत असल्याचे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी व्यक्त केले. शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसतील तर शेतकऱ्यांनी संपावर जावं असेही जानकर म्हणाले. महादेव जानकर आज बुलढाण्यात बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं. मत चोरी आणि बोगस मतदार मुद्द्यावर ते चांगलेत संतापले होते.

कृषीप्रधान देशात जर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नसतील तर शेतकऱ्यांनी संपावर जावं

राज्यात आणि देशात मत चोरी होत असल्याचा विरोधकांचा आरोप हा सत्य आहे. त्याच्याशी मी सहमत आहे. मला स्वतःला मत चोरीचा अनुभव आला असून याबाबत निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असूनही गप्प का? असा सवाल महादेव जानकर यांनी उपस्थित केला आहे. मत चोरी आणि बोगस मतदार याबाबतीत राज ठाकरेंच्या भूमिकेशी मी सहमत आहे तर कृषीप्रधान देशात जर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नसतील तर शेतकऱ्यांनी संपावर जावं असा आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. कर्जमाफीच्या मुद्यावरुन राज्यातील शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत. तसेच अतिवृष्टी आणि पुरामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं दिलेली मदत ही तोकडी असल्याचं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. याच मुद्यावरुन विरोधकांनी देखील सरकारवर टीका केली आहे.

पंकजा मुंडे यांचा पक्ष आणि माझा पक्ष वेगळा

पंकजा मुंडे या जरी माझ्या बहिणी असतील मात्र त्यांचा पक्ष आणि माझा पक्ष वेगळा आहे. आमचं राजकारणाच्या पलीकडचे वेगळं नातं आहे. त्यामुळं पुनर्वसनासाठी प्रयत्न करण्याचा प्रश्नच येत नाही असंही महादेव जानकर म्हणाले.

राज ठाकरेंचा आरोप काय?

निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार यादीत नव्याने 96 लाख बोगस मतदार घुसवले आहेत, असा खळबळजनक आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला. मला असं कळालं की, 1 जुलैला निवडणूक आयोगाने (Election Commission) मतदारांची यादी बंद केली. त्यानंतर महाराष्ट्रात मतदारांच्या यादीत 96 लाख खोटे मतदार भरले आहेत, अशी माहिती मला खात्रीलायक सूत्रांनी दिल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या या भूमिकेचं महादेव जानकर यांनी समर्थन केलं आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेशी मी सहमत असल्याचे जानकर म्हणाले. मतचोरी होत असल्याचा मला अनुभवअसल्याचेही जानकर म्हणाले.

आणखी वाचा

Comments are closed.