भाजपने मेधा कुलकर्णींना आवरावे, शनिवारवाडा ही वास्तू कोणाच्याही बापाची नाही; रुपाली ठोंबरे पाट
पुणे शनिवार वाडा बातम्या: शनिवारवाड्यात महिलांकडून सामूहिक प्रार्थना करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्या विरोधात काल काही संघटनांकडून निदर्शने करण्यात आली होती. या प्रकरणाची संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. दरम्यान याप्रकरणी अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांनी दिली. शनिवारवाड्यामध्ये काही महिलांनी सामूहिक प्रार्थना (Namaz Pathan) केली. त्याचा व्हिडिओ रविवारी समाज माध्यमावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ एक-दोन दिवसांपूर्वीचा आहे. त्यानंतर काही संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शनिवारवाड्याच्या (Shaniwar wada) आवारात निदर्शने केली. शनिवारवाडा ही भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाची वास्तू आहे. पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्याकडून रात्री तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास विश्रामबाग पोलिस करत आहेत. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी मागणी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. (Pune News)
शनिवारवाड्यातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रविवारी भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी प्रचंड आक्रमक झाल्या होत्या. पतीत पावन संघटना व मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्याच्या परिसरात शिववंदना करण्याचा प्रयत्न केला. तसेच या परिसरात गोमुत्रही शिंपडण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी या सगळ्याला मज्जाव केल्याने पोलीस आणि मेधा कुलकर्णी यांच्यात बाचाबाचीही झाली होती. ज्या ठिकाणी नमाज पडला गेला त्या ठिकाणी जाऊन आम्हाला शुद्धीकरण करायचे आहे, असा पवित्रा मेधा कुलकर्णी यांनी घेतला होता. मात्र, पोलिसांकडून त्यांना शनिवारवाड्यात जाण्यास मनाई करण्यात आली.
Medha Kulkarni BJP: पुण्यात महायुतीमध्ये पुन्हा एकदा वाद
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. पुण्यात भाजपने खासदार मेधा ताई यांना आवरा बाबा. शनिवारवाडा ही वास्तू कोणाच्या बापाचा नाही. शनिवारवाडा मराठा साम्राज्य, पेशव्यांचा आहे. पुणेकर सर्व जाती धर्मांचे आहेत. मेधा कुलकर्णी पुण्यातील हिंदू-मुस्लिम बांधवांचं वातावरण खराब करत आहेत. जाणीवपूर्वक तेढ निर्माण करत आहे.त्या विसरल्या आहेत की त्या खासदार आहे,अशी टीका रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली.
कोथरुडमध्ये नाटकं झाली, आता कसब्यातून येऊन जाणीवपूर्वक हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करत आहेत. त्यांच्यावरच तातडीने गुन्हा दाखल करा. खासदार ताईला प्रार्थना असो की दुवा करणे असो एकच आहे हे समजत नाही किंवा त्या जाणीवपूर्वक करत आहे. मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्यामध्ये येऊन जी नाटकं केली त्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे, असे रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.