अरे भाई उसे पॉपकॉर्न मत दे…; रोहित शर्माला बघताच मित्र अभिषेक नायर भडकला, नेमकं काय म्हणाला?


रोहित शर्माने पॉपकॉर्न खाल्ल्यानंतर अभिषेक नायरची प्रतिक्रिया विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गजांनी सजलेल्या भारतीय संघाला पहिल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने डकवर्थ-लुईस-स्टर्न (डीएलएस) नियमानुसार 7 गड्यांनी पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताचा डाव 26 षटकांत 9 बाद 136 धावांवर रोखला गेल्यानंतर डीएलएस नियमानुसार ऑस्ट्रेलियाला 131 धावांचे आव्हान मिळाले. हे लक्ष्य यजमानांनी 21.1 षटकांत 3 फलंदाजांच्या मोबदल्यात सहज पार केले.

मार्चमधील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर रोहित आणि कोहली प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी उतरले, पण दोघेही अपयशी ठरल्याने भारतीय चाहत्यांची अधिक निराशा झाली. हिटमॅन रोहित फक्त 8 धावा करून बाद झाला, तर किंग कोहलीला खातेही उघडता आले नाही. पावसामुळे अनेक वेळा सामना थांबवावा लागला. यादरम्यान एक मजेशीर क्षण कॅमेऱ्यात टिपला गेला. नवीन वनडे कर्णधार शुभमन गिलसोबत रोहित शर्मा पॉपकॉर्न खाताना दिसला. तेव्हा समालोचक अभिषेक नायर म्हणाला, “अरे भाऊ, त्याला पॉपकॉर्न देऊ नकोस.”


कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तयारी करत होता. त्याचं प्रशिक्षण त्याचा खास मित्र आणि भारताचा माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्या देखरेखीखाली झालं. मुंबईत अनेक महिने त्याने कठोर सराव केल्यानंतर रोहितचा एक नव्या लूकमध्ये सगळ्यांसमोर आला.

रोहित शर्मावर अभिषेक नायर काय म्हणाला?

अभिषेक नायर म्हणाला की, “रोहितच्या वजन कमी करण्याबद्दल बरीच चर्चा झाली आहे. सुरुवातीला आमचं लक्ष्य होतं त्याला आणखी फिट आणि चपळ बनवण्याचं. ब्रिटनमधून सुट्टी संपवून आल्यानंतर त्याचा फोटो व्हायरल झाला होता, आणि तेव्हाच त्याने स्वतःमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. त्याला पुन्हा एकदा दमदार पुनरागमन करायचं होतं.”

तो पुढे म्हणाला, “2027 च्या वनडे विश्वचषकाच्या दृष्टीने त्याने आपली फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं आहे. कौशल्य तर त्याच्याकडे नेहमीच होतं, पण नव्या फिटनेसने त्याच्या स्किल्सलाही अधिक धार आली आहे. तो आता अधिक चपळ दिसतोय.”

रोहित शर्माने भारतीय चाहत्यांची केली निराशा

पण, पहिल्या वनडे सामन्यात रोहितने रोहित शर्माने भारतीय चाहत्यांची निराशा केली. त्याने 14 चेंडूत 8 धावा केल्या आणि जोश हेजलवूडच्या चेंडूवर रेनशॉच्या हाती झेल दिला. पावसामुळे सामन्याचे षटके कमी करून 26 करण्यात आली, आणि भारताने 9 बाद 136 धावा केल्या. डकवर्थ-लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाला 26 षटकांत 131 धावांचे लक्ष्य मिळाले. सामना सुरू होण्यापूर्वीच अभिषेक नायर यांनी खुलासा केला होता की, रोहित शर्माने तब्बल 11 किलो वजन घटवले आहे, आणि त्याचं लक्ष आता 2027 च्या वनडे वर्ल्ड कपवर आहे.

हे ही वाचा –

ICC Women’s World Cup 2025 : सेमीफायनलच्या चौथ्या जागेसाठी पाचही संघांना संधी; कोण मारणार बाजी?, वर्ल्डकपचं च्रकावणारं Points Table

आणखी वाचा

Comments are closed.