निवडणुकीच्या तोंडावर रायगडमध्ये गोगावलेंची खेळी, राष्ट्रवादीला धक्का, तटकरेंचे निकटवर्तीय सेनेत


किरण: रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला जोरदार धक्का बसला आहे राष्ट्रवादीचे आणि खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्गीय असलेले विकास गायकवाड यांनी आज मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळं अजित दादांच्या राष्ट्रवादीला रायगडमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसणार आहे. विकास गायकवाड हे राष्ट्रवादीमध्ये सक्रिय आणि तटकरे यांचे जवळचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर मंत्री गोगावलेंनी दिला तटकरेंना शह

मंत्री भरत गोगावले यांनी सुद्धा सुनील तटकरे यांच्यासारखा डाव खेळत ऐन निवडणुकीच्या तोंडावर तटकरेंना शह देण्यासाठी ही खेळी खेळली असल्याच बोललं जातंय. एकीकडे आगामी काळातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची सेना रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी ला शह देण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी करत आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत महायुतीतीलच हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर आमने सामने येणार असून ही लढत अधिकच चुरशीची होणार हे चित्र आता स्पष्ट झालं आहे. दिवाळीनंतर देखील आणखीन काही राजकीय फटाके फुटणार असल्याचा दावा मंत्री भरत गोगावले यांनी यावेळी केला.

महायुती सरकार स्थापन होऊन 10 महिने होऊन गेलं तरी अद्याप  रायगड आणि नाशिकमधील पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. रायगडमधील पालकमंत्री पदासाठी मंत्री अदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा झाली होती. मात्र, शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नाराजीनंतर रायगडचे पालकमंत्री पद मागे घ्यावे लागले होतं. तटकरे कुटुंब आणि गोगावले यांच्यात विस्तवही जात नाही. सातत्याने रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन या दोन्ही नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Mahendra Dalvi on Sunil Tatkare: मी मूठ उघडली तर तटकरे चेहरा दाखवू शकणार नाहीत, महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा, रायगडमध्ये वातावरण तापलं!

आणखी वाचा

Comments are closed.