आली दिवाळी, स्नेहमिलन कार्यक्रमात दे टाळी… छत्रपती संभाजीनगरचे राजकारणी एकाच फ्रेममध्ये


Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीगनर : राज्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि सतत चर्चेत असणारा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर होय. मराठावाड्यातील महत्त्वाचा जिल्हा म्हणून छत्रपती संभाजीनगरची ओळख आहे. राजकीय नेत्यांच्या संघर्षामुळं सातत्यानं हा जिल्हा या जिल्ह्याचे राजकारणी देखील चर्चेत असतात. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील नेते देखील दोन गटात विभागले गेले. इथले राजकारणी दिवसभर, ऑन कॅमेरा एकमेकांविरुद्ध आक्रमक भूमिका घेणारे नेते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं, निमित्त होतं एका उद्योजकानं आयोजित केलेला स्नेहमिलन कार्यक्रम…

छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे प्रवक्ते सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील दिवाळीनिमित्त आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात एकत्र आलेले पाहायला मिळाले.

दिवाळीनिमित्त नेते एकत्र, फोटो व्हायरल

दिवसा एकमेकांच्या विरोधात चिखलफेक आणि रात्री दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात दे टाळी असंच काहीसं चित्र छत्रपती  संभाजीनगर मध्ये पाहायला मिळालं. हे चित्र एका उद्योजकाने आयोजित दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात पाहायला मिळालं. एरवी  कॅमेरासमोर चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांचं थोडही पटत नाही ते एकत्र बसलेले पाहायला मिळाले. अंबादास दानवे  संजय शिरसाट यांच्यावर आणि संजय शिरसाट अंबादास दानवे यांच्यावर टीका करायची एकही संधी सोडत नाही. मात्र, स्नेहमिलन कार्यक्रमात ते एकत्र पाहायला मिळाले. दिवसा एकमेकांवर टीका अन् रात्री मात्र दे टाळी असं चित्र हे व्हायरल झालेले फोटो पाहून म्हणावं लागेल.

Diwali 2025 : आली दिवाळी, स्नेहमिलन कार्यक्रमात दे टाळी... छत्रपती संभाजीनगरचे राजकारणी एकाच फ्रेममध्ये, फोटो व्हायरल

दरम्यान, इम्तियाज जलील यांनी दोनवेळा चंद्रकांत खैरे यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली होती. इम्तियाज जलील 2019 च्या निवडणुकीत विजयी झाले होते. तर, अंबादास दानवे हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडतात. तर, संजय शिरसाट हे महायुती सरकारमध्ये मंत्री असून ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची बाजू मांडण्याचं काम करतात.

आणखी वाचा

Comments are closed.