कंपनी गोखलेंची कमी यांचीच जास्त जाणवते; अगदी फ्लॅट दाखवण्याच्या जाहिराती देखील स्वतःच करायचे,
रवींद्र धंगेकर सोशल मीडिया पोस्ट: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जागा विक्री प्रकरणात धर्मादाय आयुक्तांनी काल एक महत्वाचा आदेश दिला. त्यांनी स्टेटस्को म्हणजे परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा निर्णय दिला. मात्र त्यानंतरही शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजप नेते आणि खासदार मुरलीधर मोहोळ, राज्याचे मुख्य धर्मदाय आयुक्त, कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती देत धर्मदाय आयुक्तांची फसवणूक करणारे मेरिट कन्सल्टन्सी व बिल्डर विशाल गोखले यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली आहे, त्याचबरोबर धंगेकरांनी आणखी एक पोस्ट शेअर करत मोहोळ यांना डिवचलं आहे. यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचा एक व्हिडीओ आहे, त्यामध्ये ते गोखलेंनी बनवलेल्या एका २२ मजली इमारतीची माहिती सांगताना आणि ती पाहणी करताना दिसतात.
Ravindra Dhangekar: खरच बाहेर पडले की फक्त कागदोपत्री बाहेर पडलेत हे देव जाणे…
शिवसेना नेते धंगेकरांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय, “कंपनी गोखलेंची कमी यांचीच जास्त असल्याचे जाणवते, कारण हे महाशय अगदी फ्लॅट दाखवण्याच्या जाहिराती देखील स्वतःच करायचे. तसेही 50% भागीदार म्हणजे कंपनीचा निम्मा मालक असतो. उगीच मंत्रीपदाच्या नियमामुळे मंत्रीपद मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी जड अंतकरणाने हे कंपनीतून बाहेर पडले. बर खरच बाहेर पडले की फक्त कागदोपत्री बाहेर पडलेत हे देव जाणे… कारण यांचे 50 टक्क्यांचे शेअर्स कुणाला दिलेत याच्याबद्दल कोणतीच माहिती यांनी दाखवलेली नाही”.
Ravindra Dhangekar: धंगेकरांची पोस्ट अन् व्हिडीओ
“कंपनी गोखलेंची कमी यांचीच जास्त असल्याचे जाणवते, कारण हे महाशय अगदी फ्लॅट दाखवण्याच्या जाहिराती देखील स्वतःच करायचे. तसेही 50% भागीदार म्हणजे कंपनीचा निम्मा मालक असतो. उगीच मंत्रीपदाच्या नियमामुळे मंत्रीपद मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी जड अंतकरणाने हे कंपनीतून बाहेर पडले. बर खरच बाहेर पडले की फक्त कागदोपत्री बाहेर पडलेत हे देव जाणे… कारण यांचे 50 टक्क्यांचे शेअर्स कुणाला दिलेत याच्याबद्दल कोणतीच माहिती यांनी दाखवलेली नाही. त्यामुळे कंपनीच्या भविष्यातील 30,000 कोटींचा फायद्याच्या प्रोजेक्टमध्ये यांची इन्व्हॉलमेंट नसणार का…? काय वाटतं…? खुशाल पुणेकरांना वेड्यात काढताय”.
कंपनी गोखलेंची कमी यांचीच जास्त असल्याचे जाणवते, कारण हे महाशय अगदी फ्लॅट दाखवण्याच्या जाहिराती देखील स्वतःच करायचे.
तसेही 50% भागीदार म्हणजे कंपनीचा निम्मा मालक असतो. उगीच मंत्रीपदाच्या नियमामुळे मंत्रीपद मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी जड अंतकरणाने हे कंपनीतून बाहेर पडले. बर खरच… pic.twitter.com/fNeOKb5SWG
— रवींद्र धंगेकर अधिकृत (@Dhangekarravi) 20 ऑक्टोबर 2025
Pune Jain Boarding Land: जागेचा नेमका वाद काय?
पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा शिवाजी नगर येथे आहे. जिथे दिगंबर जैन बोर्डिंग आणि शेतंबर जैन बोर्डिंग आहे. 1958 साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी या वसतीगृहाची उभारणी केली होती. ही जागा काही महिन्यांपूर्वी चर्चेत आली होती. कारण विश्वस्त या जागेवर नियंत्रण ठेवून नवीन विकास करण्यास इच्छूक होते. तर समाजातील काही लोकांनी याला विरोध केला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच ही जागा परस्पर हडप करुन तिची विक्री करण्यात आल्याचा आरोप जैन समाजाकडून केला जात आहे. पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी या जागा विक्रीला मंजुरी देताना सर्व नियम, कायद्यांची पायमल्ली केली. या जमीनविक्रीच्या व्यवहाराशी संबंध असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याशी लागेबांधे असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
Murlidhar Mohol: खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप
या प्रकरणात गोखले कन्स्ट्रक्शन या कंपनीचं नाव समोर आलं असून, याच कंपनीसोबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी होती, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यावरून आमदार रवींद्र धंगेकर यांनी थेट मोहोळ यांच्यावर टीका करत त्यांना राजीनामा देण्याची मागणी केली आहे. धंगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकरणाच्या चौकशीसाठी पत्र लिहिण्याची घोषणा केली असून, समाजाच्या भावना दुखावणाऱ्या व्यवहारात केंद्रीय मंत्री सहभागी असतील, तर त्यांनी स्वतःहून पद सोडावे, अशी मागणी केली आहे.
Murlidhar Mohol: मुरलीधर मोहोळ यांचं स्पष्टीकरण
खासदार मोहोळ यांनी या सर्व आरोपांना विरोध केला असून म्हटलं की, पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्रीच्या व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही. ज्या गोखले बिल्डर्सशी माझी भागीदारी असल्याचा आरोप होत आहे, त्यांच्या दोन्ही कंपन्यांमधून मी वर्षभरापूर्वीच बाहेर पडलो होतो. त्यामुळे जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिले.
आणखी वाचा
Comments are closed.