‘बॉस’ लोंढे पिता-पुत्राची दिवाळी तुरुंगात; नाशिक मनपा दुसऱ्या अनधिकृत बंगल्यावरही हातोडा चालवणा


नाशिक क्राईम प्रकाश लंडन : हॉटेल ऑरा बार गोळीबारप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे (Praksh Londhe) आणि त्याचा मुलगा दीपक लोंढे (Deepak Londhe) याच्यावर आणखी एक गंभीर आरोप झालाय. खुटवडनगर येथील एक बंगला बळकावून खंडणी मागितल्याच्या प्रकरणात अंबड पोलिसांनी (Ambad Police) त्यांना ताब्यात घेतले असून, न्यायालयाने दोघांना 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे लोंढे पिता-पुत्राची दिवाळी तुरुंगातच जाणार आहे.

फिर्यादी प्रमोद मधुकर अत्तरदे (वय 54, रा. एकता ग्रीन व्हॅली, पाथर्डी फाटा) यांच्या तक्रारीनुसार, संशयित प्रकाश लोंढे, दीपक लोंढे आणि भूषण लोंढे यांनी खुटवडनगरमधील सर्वे क्र. 51, प्लॉट क्र. 2 या ठिकाणी असलेला ‘पुष्कर बंगला’ अनाथाश्रम सुरू करण्याच्या बहाण्याने भाडेतत्त्वावर घेतला होता. त्यांनी आठ दिवसांत भाडे करारनामा करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी करारनामा न करता 2021 पासून आजपर्यंत कोणतेही भाडे दिले नाही.

Nashik Crime Prakash Londhe: बंगल्यावर अनधिकृत ताबा आणि खंडणीची मागणी

बंगल्यावर नियंत्रण मिळवल्यानंतर, अत्तरदे यांनी घटनास्थळी जाऊन विचारणा केली असता, दीपक आणि भूषण लोंढे यांनी त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. पुढे काही काळाने तेथे सनी विठ्ठलकर आणि निखिल निकुंभ हे आपल्या कुटुंबियांसह राहत असल्याचे आढळून आले. अत्तरदे यांनी त्यांच्याशी बोलणे केल्यावर, त्यांनी सांगितले की, “बॉस प्रकाश लोंढे म्हणालेत की, हा बंगला हवा असेल तर दोन कोटी रुपये द्यावे लागतील.” यावरून अत्तरदे यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, लोंढे पिता-पुत्र व इतर दोन जणांवर खंडणी मागणे व जीवे मारण्याची धमकी देणे या गुन्ह्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Nashik Crime Prakash Londhe: गोळीबार प्रकरणातील कोठडीतून अंबड पोलिसांच्या ताब्यात

सातपूर पोलिसांनी हॉटेल ऑरा बार गोळीबार प्रकरणात लोंढे पिता-पुत्रांना अटक केली होती. या गुन्ह्यात त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. त्याच दरम्यान अंबड पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला. त्यांना शनिवारी (दि. 18) न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे आता लोंढे पिता-पुत्रांची दिवाळी अंबड पोलीस ठाण्याच्या कोठडीतच होणार आहे.

Nashik Crime Prakash Londhe: अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई

दरम्यान, हॉटेल ऑरा बार गोळीबार प्रकरणानंतर पोलिसांनी प्रकाश लोंढे यांच्या अनधिकृत बांधकामांची झाडाझडती सुरू केली. सातपूर येथील आयटीआय सिग्नलजवळ असलेल्या लोंढे यांच्या एका अनधिकृत इमारतीवर हातोडा चालवण्यात आला. ही कारवाई पोलिस बंदोबस्तात पार पडली.

Nashik Crime Prakash Londhe: दुसऱ्या अनधिकृत बंगल्यावरही हातोडा?

यानंतर महापालिकेने त्याच भागात नंदिनी नदीच्या पूररेषेत असलेल्या लोंढे यांच्या दुसऱ्या अनधिकृत बंगल्याला नोटीस चिटकवली असून, 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, अतिक्रमण उपायुक्त संगीता नांदुरकर, सातपूर विभागीय अधिकारी राजाराम जाधव, कार्यकारी अभियंता बांधकाम गांगुर्डे, अतिक्रमण प्रमुख तानाजी निगळ संजय कोठुळे त्यांच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात लोंढे याच्या अनधिकृत बंगल्यावर नोटीस चिटकवण्यात आली आहे. आता लोंढेच्या दुसऱ्या अनधिकृत बंगल्यावर नाशिक महापालिका हातोडा चालवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा Video

आणखी वाचा

Nashik Crime Mama Rajwade: ठाकरेंना ‘मामा’ बनवून भाजपवासी झालेल्या राजवाडेंचे ग्रह फिरले; खंडणीसह जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

आणखी वाचा

Comments are closed.