चोर समजून तरुणाला जमावाकडून बेदम मारहाण, तरुणाचा मारहाणीत मृत्यू; ऐन दिवाळीत गोरेगाव हादरलं
Goregaon Crime News : मुंबईच्या गोरेगावमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात जमावाचा हल्ल्यामध्ये एका चोराच्या जागेवरच दुर्दैवी मृत्यू झालाय. इमारतीचे काम सुरु असताना तेथील कामगारांनी या चोराला पकडून बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे. हर्शल परमा असं या 26 वर्षीय तरुणाचे नाव असून या मारहाणीच्या घटनेत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिम परिसरात गोरेगाव पोलीस स्टेशनचे शेजारी राज बिल्डरकडून नवीन बांधकाम इमारतीचे काम सुरू आहे. याच इमारतीच्या तिसरा मजल्यावर इमारतीचे काम करणारे कामगार राहतात. या कामगारांचा परवा रात्री एका मोबाईल चोरट्याने तिसरा मजल्यावर चढून मोबाईल चोराला. यानंतर इमारतीमध्ये काम करणारे पाच ते सहा कामगारांकडून या चोरट्याला बेदम मारहाण केली. यानंतर दोन कामगारांनी दोराच्या सहाय्याने या व्यक्तीला इमारतीच्या तिसरा मजल्यावर भिंतीला बांधून ठेवलं. तर दोन कामगारांनी बांधल्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. तर एक कामगाराने मारहाण करत असताना फोटो काढला. यानंतर बांधकाम इमारतीचं मॅनेजरला माहिती पडल्यानंतर त्यांनी पोलिसांना या संदर्भात तात्काळ माहिती दिली.
Goregaon Crime News : चौघांवर अटकेची कारवाई
दरम्यानपोलिसांनी चोराला ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल केला असता त्या ठिकाणी डॉक्टरांनी उपचारापूर्वी त्याला मृत घोषित केले. या मारहाणीत हर्शल परमा या 26 वर्षाचा तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी सलमान मोहम्मद खान, इसम्मुला खान, गौतम चमार, राजीव गुप्ता यांचावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करून पोलिसांनी चौघांवर अटकेची कारवाई करण्यातआली आहे. दरम्यान या प्रकरणी गोरेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Satara Crime News : कराडला तीन पिस्टलसह तीन युवक ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई
सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेद्वारे मोठी कारवाई करत तीन देशी बनावटीचे पिस्टलसह तीन जिवंत काडतुसे, दोन मोबाईल, एक ब्रीझा कार जप्त केलीय. या प्रकरणी तीन तरुणकांना ताब्यात घेतलं असून यात एका बड्या दारू व्यावसायिकाच्या मुलाचाहे समावेश आहे. कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत शामगाव घाटाजवळ करवडी येथे तीन देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या तीन युवकांना स्थानिक गुन्हे शाखेने रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तीन देशी बनावटीचे पिस्टल, तीन जिवंत काडतुसे, दोन मोबाईल व एक ब्रीझा कार जप्त करण्यात आली आहे. यामध्ये कराड शहरातील एका बड्या दारू व्यवसायिकाच्या मुलाचाही समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. कार्तीक चंदवानी, ऋतेष माने, अक्षय सहजराव अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
Navi Mumbai Fire: कामोठेमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग
नवी मुंबईतील (Navi Mumbai) कामोठे (Kamothe) येथील आंबे श्रद्धा सहकारी सोसायटीमध्ये (Ambe Shraddha Sahakari Society) एका घराला आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. ‘सिलिंडरच्या स्फोटामुळे (Cylinder Blast) आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.’ ही आग इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागली असून, यामध्ये दोघेजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न शर्थीने सुरू आहेत. ही घटना घडल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाकडून बचावकार्य वेगाने सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.