माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; चाळीसगावच्या राजकारणात मोठी पोकळी


राजीव देशमुख यांचे निधन चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव देशमुख (Rajiv Deshmukh Passes Away) यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे चाळीसगाव (Chalisgaon) आणि जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

राजीव देशमुख यांनी 2009 ते 2014 या कालावधीत चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. आमदारकीच्या काळात त्यांनी चाळीसगाव आणि परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले. त्याआधी चाळीसगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) प्रदेश नेतृत्वात उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते.

2014 आणि 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला होता. मात्र, कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा प्रभाव कायम होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, विशेषतः लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी, महाविकास आघाडीकडून राजू देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू होती. पक्षात त्यांचा अनुभव, जनसंपर्क आणि प्रशासकीय जाण लक्षात घेता, त्यांना जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती.

राजीव देशमुख यांचे निधन: राजकिया वर्तुटर शोक व्यक्त करतात

राजीव देशमुख यांच्या अकाली निधनामुळे चाळीसगावसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात शोकाची लाट पसरली आहे. विविध पक्षातील नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या जाण्याने केवळ राष्ट्रवादी पक्षालाच नव्हे, तर चाळीसगावच्या सर्वपक्षीय राजकारणाने एक अनुभवी, संयमी आणि दूरदृष्टी असलेला नेतृत्वकर्ता गमावला आहे. त्यांचं स्थान तातडीनं भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Shivajirao Kardile Passes Away: मोठी बातमी: भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन, वयाच्या 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Vashi Fire news: बिछान्याला खिळलेल्या आजीबाईंना उठताच आलं नाही, खोलीतील धुराने श्वास गुदमरला अन्… वाशीतील अग्नितांडवात चौघांचा मृत्यू

आणखी वाचा

Comments are closed.