मुलीच्या छेडछाडीनंतर डाचकुल पाडा परिसरात दोन गटांमध्ये झटापट; 25 पेक्षा जास्त रिक्षांची तोडफोड
ठाणे : काशीमिरा परिसरातील डाचकुल पाडा (Kashimira Dachkul Pada) येथे एका मुलीच्या छेडछाडीनंतर सोमवारी रात्री दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाल्याची घटना घडली. त्यानंतर मंगळवारी सकाळी काही जणांकडून मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 25 पेक्षा जास्त ऑटो रिक्षांच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच काशिमीरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, काही व्यक्ती हातात दांडके, लोखंडी सळ्या आणि दगड घेऊन आले होते आणि त्यांनी रिक्षांच्या काचा फोडल्या. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Kashimira Crime : दोषींवर कारवाई सुरू
दरम्यान, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन उपद्रव माजवणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू केली. या घटनेची माहिती मिळताच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घटनास्थळी पोहोचून स्वतः नागरिकांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती घेतली व दोषींवर कारवाई करण्यासाठी सांगितले. तसेच या परिसरात अमली पदार्थ विक्री होते त्यावर सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश दिले. सध्या पोलिसांनी डाचकुल पाडा परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवला आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “डाचकुल पाडा भागात गुन्हेगारी वाढत आहे. बाहेरून आलेले बांग्लादेशी घुसखोर, रोहिंग्या घुसखोर या ठिकाणी आलेले असण्याची शक्यता आहे. त्यावर पोलीस कारवाई करतील. या भागात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री होते अशी माहिती आहे. काल काही लोकांनी इथल्या एका मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.”
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.