लग्न झाल्यापासून वारंवार वाद; रविवारी दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक चकमक, राग अनावर झालेल्या नवऱ्या


मुंबई: मुंबईतील अँटॉप हिलमधील प्रतिक्षानगर येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या (Mumbai Crime News) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चंदादेवी यादव (वय वर्षे २७) असे मृत महिलेचे नाव आहे. चंदादेवी यांचे पती रामसिंगार यादव याच्यासोबत लग्नानंतर वारंवार वाद होत होते. रविवारी दोघांमध्ये पून्हा शाब्दीक वाद झाला, यावेळी राग अनावर झालेल्या रामसिंगार याने पत्नी चंदादेवी हिला बेदम मारहाण केली. या मारहाणीत (Mumbai Crime News) गंभीर जखमी झालेल्या चंदादेवी यांना उपचारासाठी सायन रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान चंदादेवी हिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी आरोपी रामसिंगार याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.(Mumbai Crime News)

Mumbai Crime News: किरकोळ कारणावरून त्यांच्यात शाब्दिक वाद

मुंबई महानगरातील अँटॉप हिल परिसर या घटनेने हादरला आहे. प्रतिक्षानगर येथे रविवारी पती-पत्नीतील वादाचे रूपांतर भीषण हत्येत झाले. या घटनेत 27 वर्षीय चंदादेवी यादव हिचा तिच्या पतीकडून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, चंदादेवी यादव आणि तिचा पती रामसिंगार यादव हे दोघे प्रतिक्षानगर परिसरात राहत होते. विवाहानंतर दोघांमध्ये वारंवार वाद व्हायचे. रविवारीही किरकोळ कारणावरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. मात्र, या वेळी राग अनावर झालेल्या रामसिंगारने चंदादेवीवर बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये चंदादेवी गंभीर जखमी झाली. कुटुंबीयांनी तिला तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

Mumbai Crime News: घरात नेहमी वाद व्हायचे

घटनेची माहिती मिळताच वडाळा टीटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्राथमिक चौकशी सुरू केली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. रामसिंगार यादव याला पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत महिला यांचे घरात नेहमी वाद व्हायचे. रविवारी झालेल्या वादातच चंदादेवीचा बळी गेला, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.