हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; लिव्ह इनमध्ये राहतात?
मुंबई : क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आपला भूतकाळ विसरून पूर्णपणे मूव्ह ऑन झाला असून तो आता नव्या प्रेमात आनंदी असल्याचं दिसतंय. हार्दिकने अलीकडेच 8 वर्षांनी लहान असलेल्या मॉडेल माहिका शर्मा (Mahika Sharma) सोबत आपलं नातं सार्वजनिक केलं आहे. दोघे सोशल मिडीयावर एकत्रित फोटो शेअर करत प्रेमाचा दाखला देत आहेत. एवढंच नाही तर त्यांनी दिवाळी एकत्र साजरी केली आणि एअरपोर्टसारख्या ठिकाणीही दोघे एकत्र दिसतात.
हार्दिक आणि माहिकाचे फोटो मोठ्या प्रमाणावर वायरल झाले असून हार्दिकची अलीकडील इंस्टाग्राम (Instagram) पोस्ट चर्चेत आली आहे. त्यावर हे दोघेही लिव्ह इनमध्ये राहतात का असा प्रश्न हार्दिकच्या फॅन्सना पडला आहे.
Hardik Pandya Instagram Post : हार्दिकची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
हार्दिक आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका लॉंग विकेंडवर होता, त्यावेळी त्याच्यासोबत माहिका शर्माही होती. सुट्टी संपून परतल्यानंतर हार्दिकने इंस्टाग्रामवर समुद्रकिनारी हातात हात घालून फिरत असलेले फोटो शेअर केले. या पोस्टला त्यांनी ‘धन्य’ असं कॅप्शन दिलं आहे.
या फोटोमध्ये दोघे एकत्र उभे आहेत, गाडी बाहेर असून त्याकडे पाहताना दिसत आहेत आणि हार्दिकचा मुलगा देखील या फोटोमध्ये आहे. या पोस्टमुळे लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे, की हे दोघं लिव्ह-इनमध्ये राहायला लागलेत का?
सोशल मीडियावर अनेकांनी या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने प्रश्न केला की, ‘तुम्ही लिव-इनमध्ये आहात का? तर दुसऱ्याने म्हटलं, ‘योग्य आहे, एकाच घरात राहिलं तर खर्चा बचत होईल.
Hardik Pandya Mahika Sharma : एकत्र दिवाळी साजरी
अलीकडेच दिवाळी पार्टीमध्ये हार्दिक आणि माही मॅचिंग कपड्यांमध्ये दिसले. माहिकाने पारंपरिक लाल रंगाचा बंधनी सूट आणि हार्दिकने लाल कुर्ता, काळा ट्राउझर परिधान केला होता. त्यानंतर दोघे एकत्र कारमध्ये निघताना देखील दिसले.
हार्दिकने या आधी नताशा स्टेनकोविक यांच्याशी लग्न केले होते. 2020 मध्ये त्यांनी साखरपुडा केला आणि त्याच वर्षी त्यांना मुलगा झाला. नंतर 2023 मध्ये गोव्यात हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न झाले.
Hardik Pandya Relationship : भूतकाळ विसरून हार्दिक पांड्या मूव्ह ऑन
एका वर्षानंतर 2024 मध्ये दोघांनी सहमतीने वेगळे होण्याची घोषणा केली होती. त्यांनी एकाच वेळी पोस्ट करून सांगितले की ते दोघे वेगळे झाले असूनही मुलांचे संगोपन मात्र एकत्र करतील. त्यानंतर हार्दिकचे नाव गायक ज्यास्मिन वालिया हिच्याशीदेखील जोडले गेले.
या सगळ्या गोष्टी विसरून हार्दिक पांड्या आता मू्व्ह ऑन होत आहे. त्याचे आणि माहिका शर्माचे नाते अधिक मजबूत होत असल्याचेही दिसत आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.