ब्रेकअपनंतर भेटले, संतापलेल्या सोनूने ‘ती’च्यावर केले वार, नर्सिंग होममध्ये जीव वाचवण्यासाठी गे
मुंबई क्राईम न्यूज: गजबजलेल्या आणि दाट लोकवस्तीच्या काळाचौकी (kalachowki) परिसरात शुक्रवारी सकाळी घडलेल्या एका थरारक घटनेने मुंबई (Mumbai Crime News) हादरली आहे. प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर एका तरुणाने आपल्या प्रेयसीवर भररस्त्यात चाकूने वार केले आणि नंतर स्वतःचाही गळा चिरून आत्महत्या केली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काळाचौकीतील आंबेवाडी भागात राहणारा सोनू बराय (वय 24) आणि त्याच परिसरातील मनीषा यादव हे दोघे काही महिन्यांपासून प्रेमसंबंधात होते. मात्र, गेल्या दहा दिवसांपूर्वी काही कारणाने त्यांच्यात वाद होऊन ब्रेकअप झाले होते. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दत्ताराम लाड मार्गावरील मयुरेश इमारतीसमोर दोघांची भेट झाली. बोलण्यातून वाद सुरु झाला आणि रागाच्या भरात सोनूने खिशातून चाकू काढला. त्याने मनीषावर वार करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मनीषा आरडाओरड करत पळाली आणि जीव वाचवण्यासाठी जवळच असलेल्या आस्था नर्सिंग होममध्ये धाव घेतली.
Mumbai Crime News: नर्सिंग होममध्येही हल्ला
परंतु संतापलेल्या सोनूने तिचा पाठलाग करत नर्सिंग होममध्ये प्रवेश केला आणि तिथेही तिच्यावर जीवघेणे वार केले. आजूबाजूचे नागरिक आणि नर्सिंग होममधील कर्मचारी मदतीसाठी धावले असता, सोनूने त्याच चाकूने स्वतःचाच गळा चिरून घेतला. काही क्षणांतच दोघेही रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.
Mumbai Crime News: तात्काळ मदतीसाठी पोलिसांचा प्रतिसाद, पण…
घटनेची माहिती मिळताच काळाचौकी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्याच वेळी, जवळच वाहतूक नियंत्रणाचे काम बजावत असलेले कॉन्स्टेबल किरण सूर्यवंशी यांना काही नागरिकांनी माहिती दिली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता नर्सिंग होममध्ये धाव घेतली, सोनूच्या तावडीतून मनीषाची सुटका केली आणि तिला टॅक्सीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालयात दाखल केले.
Mumbai Crime News: दोघांचाही मृत्यू
तेथे तिला तातडीने प्रथमोपचार देण्यात आले, मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, सोनूला केईएम रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. रुग्णालयात काही तास चाललेल्या उपचारांनंतर मनीषानेही अखेर सायंकाळी प्राण सोडले. तिच्या शरीरावर चाकूचे अनेक वार झाल्यामुळे अतिरक्तस्त्राव होऊन तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.