महाप्रवेश सोहळे सुरु होणार, ऑपरेशन लोटस थांबणार नाही, जयकुमार गोरेंनी वाढवले मित्र पक्षांसह विर
जयकुमार गोरे : सोलापूर जिल्ह्यात सध्या सुरू असलेले ऑपरेशन लोटस थांबणार नसून अनेक दिग्गज नेते भाजपच्या प्रवेशासाठी वेटिंग वर असल्याचे मत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले. ज्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली त्या सर्वांचे महाप्रवेश सोहळे आता सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अजूनही अनेक प्रस्ताव आपल्याकडे येत असून सर्व जागा तुम्ही लढा पण आम्हाला सोबत घ्या असेही सांगितले जात असल्याचा टोला गोरे यांनी लगावला.
पूरग्रस्तांच्या मदतीत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचा इशारा
सोलापूर जिल्ह्यात आलेल्या महापूरमुळं शासकीय मदतच पोहोचू न शकल्याने शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करता आली नव्हती. याचे वास्तव एबीपी माझा ने दाखवल्यानंतर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अतिवृष्टी किंवा पूरग्रस्तांच्या मदतीत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यात महापुरामुळे हजारो शेतकरी उध्वस्त
सोलापूर जिल्ह्यात महापुरामुळे हजारो शेतकरी उध्वस्त झाले आहेत. या पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदत देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानुसार शासनाने पाच दिवसांपूर्वी पैसे पाठवून दिले होते. मात्र तरीही केवळ दहा टक्के शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोचू शकल्याने शेतकऱ्यांची दिवाळी कडू झाली होती. यावर पालकमंत्र्यांना छेडले असता शासनाने पाच दिवसांपूर्वी नुकसान भरपाईची रक्कम पाठवून दिलेली होती. मात्र तरीही ही रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नसेल तर या सर्व प्रकाराची आता चौकशी केली जाईल. जर यामध्ये खरंच काही तांत्रिक अडचणी असतील तर त्याचाही विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. मात्र अडचण नसताना अधिकाऱ्याने शेतकऱ्यांपर्यंत पैसे मिळू दिले नसतील तर अशांची चौकशी करून त्यावर तातडीने कारवाई केली जाईल असा इशारा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे, मोहोळचे यशवंत माने आणि सोलापूर दक्षिणचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने हे पक्षप्रवेश होणार असल्याचे बोलले जात असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही एक मोठी खेळी मानली जात आहे. त्यात, आता दीपक साळूंखे यांचेही नाव जोडले जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
आधी 4, आता आणखी एक माजी आमदार भाजपच्या गळाला? मंत्री जयकुमार गोरेंचे ऑपरेशन लोटस
आणखी वाचा
Comments are closed.