नागपूरमध्ये संतापजनक घटना, सहावीतील मुलीला लॉजवर नेऊन नराधमांकडून शारीरिक अत्याचार


नागपूर क्राईम न्यूज : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरुन (Phaltan Doctor Suicide case) सध्या राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. असे असताना नागपूरमध्ये (Nagpur Crime News) एक संतापजनक घटना उघड झाली आहे. नागपूरात 12 वर्षांच्या सहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार (Crime News) केल्याची घटना घडली आहे. यात अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिला नागपूर जवळच्या भिलगाव परिसरातील लॅाजवर नेऊन दोन आरोपींनी अत्याचार केल्याचे समोर आलं आहे. शहराच्या नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या चिमुकलीसोबत हि संतापपालक कार्यक्रम घडलीय.

Crime News : दोन आरोपींना अटक, बलात्कार,पोस्कोच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल

दरम्यान, यातील आरोपींनी अत्याचार करतानाचे व्हिडीओ काढले. सोबतच कुणाला सांगितल्यास व्हिडीओ व्हायरल आणि जीवे मारण्याची धमकी हि दिली. या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी करण आणि रोहीत या दोन आरोपींना अटक केली. दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीची असून दोघांवर यापूर्वी अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गुरुवारी हि अत्याचाराची धक्कादायक घटना घडली असून शुक्रवारी सायंकाळी पिडीतेच्या आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलीसांनी आरोपी विरुद्ध बलात्कार आणि पोस्कोच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केलाय. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. फक्त या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बोरिवलीतील (Borivali) तरुणीने प्रियकरासोबत लग्न न करता ‘रिलेशनशिप ऍग्रीमेंट’ (Relationship Agreement) केल्याने खळबळ उडाली आहे. विश्व हिंदू परिषदेने (VHP) याला ‘लव्ह जिहाद’चा (Love Jihad) नवा प्रकार म्हटलं आहे. ‘मला माझी मुलगी पाहिजे, मी सगळ्यांना सांगतेय की मला फक्त माझी मुलगी परत हवी आहे’, असं म्हणत पीडित मुलीच्या आईने एबीपी माझाकडे आपली व्यथा मांडली. मालाडमध्ये शिकत असताना या तरुणीची शाहिद शेख नावाच्या मुलासोबत ओळख झाली होती. घरच्यांच्या विरोधानंतर ती त्याच्यासोबत पळून गेली. विशेष म्हणजे, तिने मुलाशी लग्न न करता ‘लिव्ह-इन रिलेशनशिप ऍग्रीमेंट’ केले आणि त्याची प्रत आईच्या मोबाईलवर पाठवली. यापूर्वीही एकदा तरुणी पळून गेली होती, मात्र तिला समजावून घरी आणण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

आणखी वाचा

Comments are closed.