इतका लबाड मुख्यमंत्री देशाने पाहिला नाही; कर्जमाफीच्या मुद्दयावरुन बच्चू कडूंचे टीकेचे आसूड
Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अभ्यास सुरू आहे, असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आपण सर्वजण चार-चार पुस्तके पाठवून देऊ. अजूनही कर्जमाफीचा मुहूर्त काढायला बामणाची वाट पाहत आहात का? तुम्हाला मिळत नसेल तर यूपीमधून एखादा बामन आणून देतो, पण शेतकऱ्यांची लगेच कर्जमाफी करा. अशा शब्दात प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सडकून टीका केली. काल (25 ऑक्टोबर) रात्री सांगोला तालुक्यातील घेरडी येथे शेतकऱ्यांचा आसूड मेळावा घेण्यात आला होता. त्यावेळी कडू (Bacchu Kadu) बोलत होते. या मेळाव्यासाठी महादेव जानकर, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि आबासाहेब मोटे आदी उपस्थित होते.
Bacchu Kadu : झेंडा बनतो त्या कापसाला किंमत नाही, पण झेंड्याच्या रंगाला मात्र किंमत
आजवर इतका लबाड मुख्यमंत्री देशाने पाहिला नाही, एवढे लबाड देवाभाऊ बोलतात असे सांगत आता सोयाबीन खरेदीचा प्रस्ताव केंद्राला पाठवल्याचे ते सांगतात. नंतर मोदींना कधी जाग यायची आणि कधी सोयाबीन खरेदी व्हायची, अशा शब्दात बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आसूड ओढले. दुर्दैवानं सध्या ज्यापासून झेंडा बनतो त्या कापसाला किंमत नाही, पण झेंड्याच्या रंगाला मात्र किंमत आली आहे. अशी टीका करताना तुम्ही कोणताही झेंडा घ्या, मात्र या झेंड्यासाठी कापूस बनविणारा तुमचा बाप शेतकऱ्याच्या कापसाला किंमत नाही, अशी टीका कडू यांनी केली.
बच्चू कडू नरेंद्र मोदींवर : ५६ इंच रुंदघ्या मोदींची ट्रम्पला भीतीतात
एक लाख कोटी बजेट असणाऱ्या मुंबईला राज्य सरकारच्या बजेटमधून 65 हजार कोटी रुपये देतात. मात्र उर्वरित राज्याला त्यापेक्षा कमी मिळते. हे अर्थकारण का? असा सवाल करीत आम्ही शेतकरी संख्येने जास्त, आवाजाने जास्त, मतदानानेहे जास्त आणि पिकविण्यातही जास्त असून आमच्यापेक्षा मूठभर कंपनीवाल्याला जादा बजेट दिले जाते. एकमेव कारण शेतकरी जागा होत नाही हेच असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. यावेळी मोदींवर टीका करताना 56 इंच वाघ्या मोदींची ट्रम्पला भीतीतात आणि तिथे त्याच्यापुढे नमाज पडतातअसे सांगत शेतकऱ्यांवर केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारकडून अन्याय होत आहे. आता शेतकऱ्यांनी जात, धर्म, पक्ष, सोडून एकत्र आल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नसल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.
आणखी वाचा
Comments are closed.