‘मुरलीधर मोहोळांनी गोखलेंना स्वस्तात प्रायव्हेट जेट दिलं, 197 कोटी वाचवले’; धंगेकरांचा आरोप
Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्री व्यवहारावरुन शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्याविरोधात आरोपांची राळ उडवून दिली होती. रवींद्र धंगेकर यांनी हे प्रकरण थेट पंतप्रधान मोदी (पीएम मोदी) यांच्यापर्यंत नेले आहे. धंगेकरांच्या या आरोपांमुळे मुरलीधर मोहोळ यांच्या कारभाराबाबत अनेकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. अशातच आता रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर आणखी एक सनसनाटी आरोप केला आहे. मोहोळ यांनी त्यांच्या केंद्रीय उड्डाण राज्यमंत्रिपदाचा विशाल गोखले (Vishal Ghokhale) यांच्यासाठी गैरवापर केला. केंद्रीय मंत्री असलेल्या मोहोळ यांनी विशाल गोखले यांना हवाई प्रवासासाठी अत्यंत स्वस्त दरात प्रायव्हेट जेट उपलब्ध करुन दिले होते. या प्रायव्हेट जेटच्या वापरासाठी विशाल गोखले यांना एरवी 200कोटी रुपये भरावे लागले असते. मात्र, मुरलीधर मोहोळ यांनी हस्तक्षेप केल्यामुळे फक्त 2.30 कोटींमध्ये तडजोड झाली. या सगळ्यामुळे मुंबई फ्लाईंग क्लबचे तब्बल 197 कोटी रुपयांचे नुकसान झाले, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकरांच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
पुण्यातील जैन बोर्डिंग होस्टेलच्या बेकायदा जमीन खरेदी व्यवहारातील मुख्य लाभार्थी असणाऱ्या श्री. विशाल गोखले यांना लाभ मिळवून देण्याची केंद्रीय राज्यमंत्री श्री.मुरलीधर मोहोळ यांची ही पहिलीच वेळ नाही. केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री पदाचा गैरवापर करत यापूर्वी देखील एका प्रकरणात मोठी अनियमित केली असल्याचे निदर्शनास येत आहे. सदर प्रकरणात ज्या कंपनीला फायदा करून दिला त्या कंपनीने मुरलीधर मोहोळ यांचा व्यावसायिक भागीदार अशी ओळख असलेल्या श्री.विशाल गोखले यांना विविध ठिकाणी प्रवास करण्यासाठी प्रायव्हेट जेट देखील उपलब्ध करून दिल्याचे निदर्शनास आले आहे.
पुण्यातील जैन बोर्डिंग होस्टेलच्या बेकायदा जमीन खरेदी व्यवहारातील मुख्य लाभार्थी असणाऱ्या श्री. विशाल गोखले यांना लाभ मिळवून देण्याची केंद्रीय राज्यमंत्री श्री.मुरलीधर मोहोळ यांची ही पहिलीच वेळ नाही…..
केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री पदाचा गैरवापर करत यापूर्वी देखील एका… pic.twitter.com/UFckuebg3n
— रवींद्र धंगेकर अधिकृत (@Dhangekarravi) 26 ऑक्टोबर 2025
जुहू विमानतळावरून आपले ऑपरेशन्स चालवणाऱ्या बॉम्बे फ्लायिंग क्लबकडून एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) ला देय (भरणा) असलेल्या रकमेच्या वसुली ,थकबाकीबाबत लेखापरीक्षण अहवाल आणि अंतर्गत अंदाजांनुसार नमुद केल्याचे आढळून आले आहे. नियमानुसार क्लबकडून व्यावसायिक दरांनुसार शुल्क आकारले गेले असते, तर सुमारे एकूण थकबाकी ₹200 कोटींची वसुली करणे अपेक्षित होते . परंतु केंद्रीय राज्यमंत्र्याच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागामुळे हे प्रकरण केवळ ₹2.30 कोटींमध्ये तडजोड करण्यात आलेली असल्याचे दिसून येत आहे.
श्री.मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या केंद्रीय मंत्री पदाचा गैरवापर करत मुंबई फ्लाईंग क्लबवर दाखवलेल्या मेहरबानीमुळे हवाई उड्डाण विभागाचे सुमारे 197 कोटी रुपयांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून ज्या क्लबला याचा फायदा मिळवून दिला त्या मुंबई फ्लाईंग क्लबने विशाल गोखले यांच्यासाठी प्रायव्हेट जेट पाठवले होते.यामागे नेमकी कोणत्या प्रकारच्या कामाची दलाली श्री.विशाल गोखले मार्फत केंद्रीय राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे हा तपासाचा विषय आहे. याबाबत श्री मुरलीधर मोहोळ यांनीच खुलासा करावा. सोबत संबंधित क्लबच्या प्रायव्हेट जेटने विशाल गोखले यांचा कुंभमेळाव्याचा व्हिडिओ शेअर करत आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.