अखेर डील रद्द झाली, जैन बोर्डिंग हाऊसला आता गोखले बिल्डर्सला 230 कोटी परत करावे लागणार


पुणे जैन बोर्डिंग हाऊस डील: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीचा बहुचर्चित विक्री व्यवहार अखेर रद्द होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. जैन बोर्डिंग हाऊसच्या विश्वस्तांनी ही जागा गोखले बिल्डर्सला (Gokhale Builders) विकली होती. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर आणि राजू शेट्टी यांनी या जमीन व्यवहारावरुन रान उठवले होते. या जमीन विक्री व्यवहारात भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप झाला होता. मोहोळ यांनी हे आरोप निराधार असल्याचे सांगत फेटाळूनही लावले होते. मात्र, रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी हे प्रकरण ताकदीने लावून धरल्याने हा संपूर्ण व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडला होता. अखेर विशाल गोखले यांनी रविवारी जैन बोर्डिंग हाऊसला एक ई-मेल पाठवून हा व्यवहार रद्द करण्याची विनंती केली.

विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या चेअरमन आणि ट्रस्टी यांना जमिनीचा व्यवहार रद्द करण्यासंदर्भात ई-मेला पाठवला आहे. धर्मादाय आयुक्तालय यांना सुद्धा पत्र पाठवून पूर्ण व्यवहार रद्द झाल्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे ई -मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी धर्मादाय आयुक्तांनी या व्यवहाराला स्थगिती दिली होती. गोखले बिल्डर्सकडून या जमीन व्यवहारासाठी जैन बोर्डिंग हाऊसला 230 कोटी  रुपये देण्यात आले होते. हे पैसे लवकरात लवकर परत देण्यात यावेत, अशी मागणी विशाल गोखले यांनी ई-मेलमध्ये केली आहे.

Amit Shah in Mumbai: अमित शाह मुंबईत अन् एकनाथ शिंदेंचं ते वक्तव्य, राजकीय योगायोग?

पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जागेच्या व्यवहाराबाबत काल गोखले बिल्डर यांनी संबंधित ट्रस्टींना आपण व्यवहार रद्द करत आहोत माझे पैसे परत द्या, असा मेल केला आहे. एका बाजूला आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत असून काल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत असलेल्या रवींद्र धंगेकर यांना दोन दिवस काही न बोलण्याचे आदेश दिले असल्याचे स्वतः रवींद्र धंगेकर यांनी सांगितले आहे. एकाच दिवशी या दोन गोष्टी घडणं हा योगायोग म्हणायचा का राजकारणाचा नवा डाव, अशी कुजबुज आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर दुसऱ्या बाजूला रवींद्र धंगेकर आजही या जैन बोर्डिंग हॉस्टेलमध्ये जाऊन तिथल्या गुरूंचे दर्शन घेणार आहे आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.

Raju Shetty: मुरलीधर मोहोळ अन् राजू शेट्टींमध्ये काय बोलणं झालं?

गोखले बिल्डर्सकडून जैन बोर्डिंग हाऊसचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर खासदार मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी रात्री साडेदहा वाजता राजू शेट्टी यांना फोन केल्याची माहिती समोर आली होती. जैन बोर्डिंगमध्ये अनेक संघटना काम करतात त्यांची बैठक झाली. काल मला मुरलीधर मोहोळ यांचा फोन आला होता. व्हॉट्सॲपवरून त्यांनी मला गोखले बिल्डर्सने हा व्यवहार रद्द केल्याचे पत्रही पाठवले. पण आम्ही पूर्णपणे समाधानी नाही, 3.5 एकर जागेवर गोखले यांचे नाव आहे. ट्रस्टने पुढे आलं पाहिजे आणि हे नाव काढून पूर्ण व्यवहार रद्द केला पाहिजे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले.

आणखी वाचा

एकनाथ शिंदे जसं म्हणाले तसंच झालं, आता मी मुरलीधर मोहोळांसह सर्वांना जिलेबी भरवणार, रविंद्र धंगेकर नेमकं काय म्हणाले?

आणखी वाचा

Comments are closed.