मराठी भाषा भवन रखडलं, पण भाजपच्या कार्यालयाची फाईल राफेलच्या वेगाने हलली; संजय राऊत कडाडले, थेट
भाजप महाराष्ट्र प्रदेश मुख्यालयावर संजय राऊत: आज मुंबईत चर्चगेट परिसरात भाजपच्या नवीन प्रदेश मुख्यालयाचे भूमिपूजन (BJP Maharashtra State Headquarter) पार पडणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र या भूमिपूजन कार्यक्रमाआधी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय.
पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, भाजप मुख्यालयाचे मुंबईत भूमिपूजन होत आहे. गृहमंत्री अमित शाह हे भूमिपूजन करायला येत आहेत. समुद्रासमोर मरीन ड्राईव्हला कार्यालय करण्यात येणार आहे. नवीन कार्यालयाचे उद्घाटन हा टीकेचा विषय असू शकत नाही. त्यांचे दिल्लीतले कार्यालय पाहाल तर ट्रम्पच्या व्हाईट हाऊसला ते मागे टाकेल. पण प्रश्न इतकाच आहे की, मरीन ड्राईव्हला मराठी भाषा भवन अडकून पडले आहे. पण गृहमंत्री भाजप मुख्यालयाचे भूमिपूजन करताय. राफेलच्या वेगाने यासाठी फाईल हलली आणि सर्व अडथळे दूर करून ही जागा महापालिकाकडून भाजपच्या मुख्यालयाला देण्यात आली.
Sanjay Raut on BJP Maharashtra State Headquarter: छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अजूनही झालं नाही
भाजपच्या पंचतारांकित मुख्यालयाचा उद्घाटन होत आहे. अमित शाह प्रामाणिक माणूस आहे. दोन नंबरचे धंदे त्यांना जमत नाही. ते जेव्हा कुदळ मारतील. तेव्हा या जमिनीमागचे सगळे रहस्य बाहेर निघतील. छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक अजून होऊ शकलं नाही. पण हे मुख्यालय होत आहे. मी या सगळ्याबाबतचं पत्र हे अमित शाह यांना दिले आहे. त्यांनी इंटलिजन्स वापरावा आणि याबाबत माहिती काढावी, असे देखील संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत अमित शहांना पत्र : संजय राऊतांचे अमित शहाण्णा पेपर
दरम्यान, संजय राऊत यांनी अमित शाह यांनी याबाबत एक पत्र देखील पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, आज आपण मुंबईतील मरिन लाइन्स येथील भाजपाच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटन सोहोळ्यासाठी येत आहात. देशभरात भाजपाने राज्यात आणि जिल्ह्यात भव्य अत्याधुनिक कार्यालये उभारली आहेत, त्याकामी अर्थात आतापर्यंत शेकडो कोटीचा खर्च केला आहे, मरीन लाईन्स येथील कार्यालय त्याच पद्धतीचे आहे.
आपण देशाचे गृहमंत्री आहात, त्यामुळे आपण उद्घाटन करीत असलेल्या कार्यालयाची जागा भाजपा मंडळीनी सत्तेचा आणि नियमांचा गैरवापर करून ताबा मिळवला आहे का हे पाहणे गरजेचे आहे, मरीन लाईन्स येथील जागा ताब्यात घेण्यासाठी अति वेगाने फाईल्स फिरवण्यात आल्या आणि अनेक ठिकाणी सरळ जोरजबरदस्ती करण्यात आली हे स्पष्ट दिसत आहे. आपण देशातील एक जबाबदार आणि ‘प्रामाणिक ‘नेते आहात असे आपले भक्त सांगत असतात, म्हणून या जागेबद्दल काही विशेष माहिती आपल्याला देत आहे. मरीन लाईन्स येथील निर्मला निकेतनजवळ भाजपाचे नवे टोलेजंग प्रदेश मुख्यालय उभे राहणार आहे. या भूखंडाबाबत महत्त्वाचा दस्तावेज समोर आला आहे. पालिकेचा निवासी उद्दिष्टासाठी राखीव असलेला भूखंड अवघ्या 11 दिवसांत भाजपाने पदरात पाडून घेतला आहे. एकनाथ रिअॅल्टर्स या बिल्डरने भाजपाला हे डील करून दिले आहे. नरीमन पॉइंट येथील एलआयसी मुख्यालयासमोर भाजपचे प्रदेश कार्यालय आहे. ही जागा अपुरी पडत असल्यामुळे नव्या जागेचा शोध सुरू होता. त्यानंतर चर्चगेट स्टेशनच्या परिसरातील महापालिकेची ही जागा भाजपच्या नजरेस पडली आणि भाजपने झटपट भखंड पदरात पाइन घेतला.
Sanjay Raut Letter to Amit Shah: जागा बँकेकडे गहाण
वासानी कुटुंबीयांकडील 46 टक्के भूभागाचे हक्क हे वेगवेगळ्या बँकांकडे महापालिकेची पूर्वपरवानगी न घेता तारण ठेवण्यात आले. जागेचे हस्तांतरण झालेले नसतानाही ही मालमत्ता विविध बँकांकडे तारण ठेवण्यात आली. पण संबंधित बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नसल्यामुळे बँकांनी या मालमत्तेचा हिस्सा ताब्यात घेतला. दरम्यान या जागेचे लीज (मक्ता कालावधी) 10 फेब्रुवारी 2001 मध्ये संपलेला आहे. लीज नूतनीकरणासाठी दी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फायनान्सने अर्ज केला होता. पण वासानी कुटुंबीयांकडून लीजच्या नूतनीकरणासाठी अर्ज केला नव्हता. वासानी यांनी त्यांचे स्वतःचे मक्ता हक्क चार गुंतवणूकदार कंपन्यांना हस्तांतरित केले. या चार गुंतवणूकदार कंपन्यांनी परस्पर बँकांकडे मालमत्ता गहाण ठेवून अटींचा भंग केल्याचे मुंबई महापालिकेला आढळून आले. यावर महापालिका उपायुक्त (सुधार) यांच्याकडे 29 डिसेंबर 2017 रोजी सुनावणी झाली. पण चार गुंतवणूक पंपन्या व कर्जदार बँकांमध्ये मक्ता हक्कावरून वाद असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले. नंतर या भूखंडाचा विषय थंड बस्त्यात होता. मात्र 2025 मध्ये यात अचानक एकनाथ रिअल्टर्सची एंट्री झाली.
Sanjay Raut Letter to Amit Shah: किती वेगाने झाला फाईलचा प्रवास
– एकनाथ रिअल्टर्सने बँकांकडे गहाण 46 टक्के भूखंड हस्तांतरणासाठी 1 एप्रिल 2025 रोजी मालमत्ता विभागाकडे अर्ज केला. त्याला 4 एप्रिल 2025 रोजी मंजुरी मिळाली.
– महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फायनान्स कॉर्पोरेशनकडून महापालिकेच्या ताब्यात घेण्यात आलेली उर्वरित 54 टक्के जागाही लीजवर देण्यासाठी एकनाथ रिअल्टर्सचा अर्ज आला. त्यालाही तत्काळ मंजुरी दिली.
– 21 कोटी 25 लाख 18 हजार 170 रुपये इतके हस्तांतरण अधिमूल्य भरून ही जागा एकनाथ रिअल्टर्सने ताब्यात घेतली. पुढच्याच महिन्यात 21 मे 2025 रोजी अर्ज करून हा पूर्ण भूखंड भाजप प्रदेश मुख्यालयाकरिता हस्तांतरित करण्यासाठी प्रस्ताव दिला.
– या अर्जाला दुसऱ्याच दिवशी 22 मे रोजी उपायुक्त (सुधार) यांनी मंजुरी दिली.
– 31 मे रोजी मक्ता हक्काचे हस्तांतरण पूर्ण झाले. त्यापोटी भाजपने 8 कोटी 91 लाख इतके शुल्क भरले.
Rohit Pawar on BJP : रोहित पवारांचा भाजपवर निशाणा
दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील भाजपवर निष्ण साधलाय. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटलंय की, राज्यात जमीन घोटाळे जोमात असताना आज मुंबईत भूमिपूजन होत असलेल्या भाजपा कार्यालयाच्या जागेबाबत देखील वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. सदरील जागा महाराष्ट्र हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनची 99 वर्ष लीजवर घेतलेली जागा असून इमारत धोकादायक आहे असे दाखवून ती ताब्यात घेऊन पाडण्यात आली आणि त्या ठिकाणी भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन होत असल्याची चर्चा आहे. एकीकडे पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात मोठ्या प्रमाणात रोष असताना भाजपा कार्यालयाच्या जागेबाबतच चर्चा सुरु असतील तर जनतेत चुकीचा संदेश जाऊ शकतो, त्यामुळे भाजपा नेत्यांनी यावर खुलासा करणे योग्य राहील, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.