रोहित आर्या पूर्ण तयारीत, खिडक्यांना लावले होते सेन्सर, बाथरुमच्या खिडकीतून पोलिसांचा प्रवेश
मुंबईतील मुले बंधक प्रकरण : मुंबईतील (Mumbai) पवईत एका व्यक्तीने 17 मुलांसह दोन पालकांना ओलीस ठेवल्याची घटना घडली आहे. रोहित आर्या असं या व्यक्तीचं नाव आहे. मात्र, पोलीस आणि अग्निशामक दलाच्या सहाय्याने या मुलांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. यावेळी आरोपी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली असून पोलिसांच्या चकमकीत आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुलांना बंदी बनवणारा रोहित आर्य पुर्ण तयारीत होता. खिडकीतून कोणी आत प्रवेश करु नाये म्हणून त्याने सगळ्या खिडक्यांना सेन्सर लावल्याची माहिती मिळाली आहे. अखेर पोलिसांनी बाथरुमच्या खिडकीतून आतमध्ये केला प्रवेश होता.
रोहित आर्या हा छऱ्याच्या बंदुकीने लहान मुलांवर हल्ला करण्याच्या होता तयारीत होता
दरम्यान, आरोपी रोहित आर्या हा छऱ्याच्या बंदुकीने लहान मुलांवर हल्ला करण्याच्या होता तयारीत होता. मात्र, पवई पोलिसांनी वेळीच हालचाल केल्याने मोठा अनर्थ टाळला आहे. रोहित आर्याच्या छातीच्या डाव्या बाजूला फायर करत पोलिसांनी मुलांची सुटका केली आहे. या घटनेनंतर झखमी झालेल्या रोहित आर्याला ट्रॉमा सेंटरला नेण्यात आले होते. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी सर्व 17 मुले आणि दोन पालकांची सुखरुप सुटका केली आहे. यामध्ये दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
पवई स्टुडिओमध्ये 17 मुलांना किडनॅप प्रकरणात दोन जण जखमी
पवई स्टुडिओमध्ये 17 मुलांना किडनॅप प्रकरणात दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून करण्यात आलेल्या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान एक सिनिअर सिटीझन महिला आणि लहान मुलगी जखमी झाली आहे. जखमीना जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार शिवाजी सावंत यांनी महिलेला सुखरूप वाचवल्याची माहिती संबंधित महिलेकडून देण्यात आली.
भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी पोलिसांचे केले अभिनंदन
या सर्व घटनेवर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. साटम यांनी मुंबई पोलिसांचे अभिनंदन केलं आहे. गुन्हा घडायच्या आधीच पोलिसांनी तात्काळ कारवाई केल्याचे साटम म्हणाले. तसेच, सोसायटीने आपला हॉल देताना नोंद ठेवली पाहिजे, पालकांनी देखील भ्रमीत करणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नये आणि जागृकता दाखवणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सूचवले.
महत्वाच्या बातम्या:
Rohit Arya Encounter : मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर, गोळी झाडल्यानंतर पोलिसांचं प्रत्युत्तर, छातीत गोळी लागली
आणखी वाचा
Comments are closed.