विरोधकांच्या मतचोरीच्या आंदोलनाला भाजप देणार प्रत्युत्तर, शनिवारी भाजप करणार मूक आंदोलन


भाजप आंदोलन: विरोधी पक्षांकडून भाजपवर सासत्याने मतचोरीचा आरोप केला जात आहे. मतांची चोरी करुन हे सरकार सत्तेत आल्याची टीका विरोधक करत आहेत. उद्या (1 नोव्हेंबर) मुंबईत मतचोरीच्या विरोधात सर्वच विरोधी पक्ष एकत्र येत मोर्चा काढणार आहेत. दरम्यान, विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप देखील सज्ज झाली आहे. विरोधकांच्या मतचोरीच्या आंदोलनाला भाजप प्रत्युत्तर देणार आहे. साधारण 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान भाजपकडून आंदोलन केलं जाणार आहे.

दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिर या ठिकाणी भाजपचे मूक आंदोलन होणार

विरोधकांच्या मतचोरीच्या आंदोलनाला भाजप प्रत्युत्तर देणार आहे. उद्या भाजपचे प्रत्युत्तर दाखल मूक आंदोलन होणार आहे. दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिर या ठिकाणी भाजपचे मूक आंदोलन होणार आहे. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगलप्रभात लोढा देखील उपस्थित राहणार आहेत.

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी : केळाला मत दिलं पण गेलं कलिंगडला, राज ठाकरेंच्या मेळाव्यात EVM घोटाळ्याचा LIVE डेमो

आणखी वाचा

Comments are closed.