भाजपकडून राज ठाकरेंवर प्रहार; उद्धव ठाकरे बंधूंसाठी छातीचा कोट करुन उभे राहिले,म्हणाले…


उद्धव ठाकरे: मतदारचे ओळख केंद्र आम्ही शाखेत सुरु करणार आहोत. सक्षम अँप आणि निवडणूक आयोग सर्व्हर (Election Commission Server) हे आयोग हाताळत नाही, असा संशय आम्हाला आहे. कोणीतरी माझ्या नावाने अँपमध्ये रजिस्टर केलं आणि मग ओटीपी आला असणार, ज्यातून माझे आणि माझ्या कटूबांचे नाव वगळले गेले असते. आम्ही मतदारांना सांगतो तुम्ही शाखेमध्ये या. तुमच्या नावात गोंधळ नाही ना? तुमची नावं तपासून घ्या. हि सगळी निवडणूक आयोगाची (Election Commission) भूताटकी आहे. त्यामुळे दुसरे कोणी मतदार तुमच्या पत्यावर असतील तर ते निदर्शनास आणून द्या. सरकार झेन-जीला घाबरतहे. आम्ही सांगतोय निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस असल्याचे सांगत शिवसेना (शिवसेना UBT)प्रमुख उद्धव उद्धव ठाकरे यांनी सरकार आणि निवडणूक आयोगावआणि सडकून टीका केली आहे.

निवडणूक आयोगावर उद्धव ठाकरे : हि सगळी निवडणूक आयोगाची भूताटकी

पहिला मुद्दा शेतकऱ्यांचा खरीप हंगाम गेलाहे. आम्ही मोर्चा काढला होता, आमची मागणी होती तेशेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. आत्ता केंद्राचा पथक तीन दिवस पाहणी करणार आहे. आता पाहणी करणार कधी आणि प्रस्ताव देणार कधी? शेतकऱ्यांचे पुढच्या वर्षी जूनमध्ये कर्जमाफी होणार तर आताचे हप्ते भरायचे कीं नाही भरायचे? मी मुख्यमंत्री असताना कर्जमाफी केली होती. महात्मा फुले कर्जमाफीचा दुसरा टप्पा जाहीर करावा, कारण डेटा तसाच आहे, आमच्याकडे कुठघेतलाही समिती नव्हती. दिवाळी आधी पैसे शेतकऱ्यांना मिळतील, हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोकळ आश्वासन दिलं होतं. आत्ता ते मिळाले की नाही ते बघू असे असताना

दरम्यान, हा आगपाखड करण्यासाठीचा दौरा नाही. जे पॅकेज जाहीर केलं होत त्यातले किती पैसे आले ते बघणार आहे. नेमकं सरकार काय करणार आहे? घोषित झालेल्या पॅकेज मधले शेतकऱ्याना काय मिळाले? यासाठी मी मराठवाडा दौरा करणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे लागणार आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना उभी आहे. असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंवर Ashish Shelar: आशिष शेलार यांचं जाहीर अभिनंदन, त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलं

दरम्यान पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी आशिष शेलार यांच्या टीकेलाहे जोरदार प्रत्युत्तर दिलंहे. मी आशिष शेलार यांचं जाहीर अभिनंदन करतो. त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलं आहे. मतचोरीचा मुद्दा ते मानतच नव्हते. त्याच्यामुळे आशिष शेलार यांनी देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचा पप्पू बोलायचं धाडस दाखवलंय, हा त्यांच्यातील अंतर्गत वादाचा परिणाम असेल. देवेंद्र फडणवीस बिहारमध्ये प्रचार करुन आल्यानंतरच आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेतली. आशिष शेलारांनी सिद्ध केलंय की, मतदार यादीत गोंधळ आहे. असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

आणखी वाचा

Comments are closed.