सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक, नवी दिल्ली ते मुंबईसह प्रमुख शहरातील दर जाणून घ्या


आज सोन्याचा भाव नवी दिल्ली : सोन्याच्या दरात 2025 मध्ये मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरानं 1 लाख 34 हजारांचा टप्पा गाठला होता. त्यानंतर सोन्याचे दर घसरले आहेत. गेल्या काही दिवसांमधील सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक लागला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 5 डिसेंबरला संपणाऱ्या वायद्याचे सोन्याचे ट्रेडिंग 121435 रुपयांपासून सुरु झालं.      आज सकाळी 9.55 वाजता मल्टी कमोडिटी एक्सचेंजला 5 डिसेंबरला संपणाऱ्या  वायद्याच्या सोने  121620 रुपयांवर ट्रेड करत होते. म्हणजेच शुक्रवारी एमसीएक्सवर सोन्याचे दर होते त्यापेक्षा 388 रुपयांची वाढ पाहायला मिळाली आहे. एमसीएक्सवर सोनं सुरुवातीच्या कारभारात 121854 रुपयांवर पोहोचले आहेत.

सोन्याप्रमाणं चांदीच्या दरात देखील मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर तेजी पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीचे दर 149078 रुपये किलो वर पोहोचले आहेत. चांदीचं ट्रेडिंग 148791 रुपयांवर सुरु झालं होतं.

तुमच्या शहरातील सोन्याचे दर (गुड रिटर्न अनुसार)

दिल्लीतील सोन्याचे दर  (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,23,320 रुपये
22 कॅरेट – 1,13,030 रुपये
18 कॅरेट – 92,510 रुपये

मुंबईतील सोन्याचे दर  (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,23,170 रुपये
22 कॅरेट – 1,12,900 रुपये
18 कॅरेट – 92,380 रुपये

चेन्नईतील सोन्याचे दर  (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,23,820 रुपये
22 कॅरेट – 1,13,500 रुपये
18 कॅरेट – 94,750 रुपये

कोलकाता येथील सोन्याचे दर  (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,23,170 रुपये
22 कॅरेट – 1,12,900 रुपये
18 कॅरेट – 92,380 रुपये

अहमदाबादमधील सोन्याचे दर  (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,23,220 रुपये
22 कॅरेट – 1,12,930 रुपये
18 कॅरेट – 92,410 रुपये

लखनौमधील सोन्याचे दर  (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,23,320 रुपये
22 कॅरेट – 1,13,030 रुपये
18 कॅरेट – 92,510 रुपये

दरम्यान, नोव्हेंबर महिन्यापासून भारतात लग्नसराई सुरु होत आहे. लग्नसराईच्या काळात भारतातील सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर वाढते. यामुळं सोने आणि चांदीची मागणी वाढणार आहे. भारतात सणांच्या काळात सोने आणि चांदी खरेदी केली जाते.

आणखी वाचा

Comments are closed.