आम्ही लाली लिपस्टीक लावून पद मागत नाहीये; रुपाली ठोंबरेंनी आंदोलनातील पोस्टर, चाकणकरांचा मेकअप
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (NCP Ajit Pawar) यांच्या पक्षातील रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) आणि रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombare Patil) या एकमेकींच्या विरोधात उभ्या असल्याचं दिसून येत आहे. त्या दोघींमध्ये वाद नेमका काय आहे, रोष काय आहे, कुठून सुरूवात झाली, याबद्दल रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombare Patil) यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. दरम्यान फलटण मधील डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणांमध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी पीडित महिलेचा चरित्र हनन केलं असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Thombare Patil) यांनी देखील आपल्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेला रूपाली चाकणकरांनी वर गंभीर आरोप करत आंदोलन केले होते. त्यामध्ये त्यांनी हातात घेतलेले पोस्टर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले होते, त्यावरतीही रूपाली ठोंबरे यांनी भाष्य केलं आहे.(Rupali Thombare Patil)
Rupali Chakankar VS Rupali Thombare Patil: आम्ही लाली लिपस्टिक लावून पद मागत नाही
‘लगाव बत्ती’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये, दोन दिवसांपूर्वी रूपाली ठोंबरे पाटील यांनी रूपाली चाकणकर यांच्या विरोधात जे आंदोलन केली त्यामध्ये बॅनर आणि पोस्टर लावले होते, त्याच्यावरती लिहिलेले होते मेकअप करके खडी तो सबसे बडी वगैरे, तुम्ही थेट चाकणकरांच्या मेकअप वरती आलात यावर उत्तर देताना रूपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या, चाकणकरांच्या विरोधात ते आंदोलन नव्हतं. ते आंदोलन महिला आयोगाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीसाठी होतं आणि चाकणकर सातत्याने म्हणतात मी सुंदर दिसते म्हणून माझ्यावर टीका होते, त्यांच्याकडे दोन पद आहेत, एक राज्य महिला आयोग आणि दुसरं प्रदेशाध्यक्ष, माझं एक मत होतं, की एक पद त्यांच्याकडे ठेवा आणि प्रदेशाध्यक्ष पदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक ज्येष्ठ महिला आहेत ज्या फार पूर्वीपासून काम करत आहेत त्यांना तुम्ही संधी द्या. तेव्हा चाकणकर म्हणायला लागल्या, नाही. नाही. रूपाली पाटील यांना प्रदेशाध्यक्ष व्हायचं आहे, राजकारणात आम्ही घरदार सांभाळून आमच्या घरच्यांचा विश्वास कमवून आम्ही कशासाठी काम करतो, पक्षात पदावर जाण्यासाठीच काम करतो, आम्ही लाली लिपस्टिक लावून पद मागत नाही, मागे फिरून पद मागत नाही. आम्ही पक्षात काम केलं असेल आमच्या कॉलिटीवर, आमच्या कामावर, कार्यशैलीवर ते पद मागतो आहे, असं रूपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलं आहे.
Rupali Chakankar VS Rupali Thombare Patil: काय लिहलं होतं पोस्टरवरती?
पुण्यामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात महिला नेत्यांनी गुडलक चौक येथे हे आंदोलन केलं होतं. विशेष म्हणजे या आंदोलनात वापरण्यात आलेल्या घोषणा सध्या चर्चेचा विषय बनल्या. या आंदोलनामध्ये आंदोलकांनी रूपाली चाकणकर यांचे व्यंगचित्र असलेले पोस्टर बनवून आणले होते. या पोस्टर बरोबरच काही घोषणा देखील देण्यात आल्या. एका पोस्टर मध्ये चेटकिणीचे व्यंगचित्र काढून त्यावर रूपांतर करून महिलांचं शोषण करणाऱ्या चेटूकार असं लिहिण्यात आलं होतं. तर काही पोस्टर मध्ये ‘मेकअप करके खडी तो सबसे बडी, झगा मगा आणि मला बघा, 800 खिडक्या 900 दार कोण्या वाट्याने गेली ती महिला आयोगाची नार, महिला आयोगाचे काम आणि मेकअप साठी थांब, दार उघड बये महिलांना न्याय देण्यासाठी दार उघड’, माकडाच्या हाती कोलीत आणि टिंब टिंब च्या हाती महिला आयोग,’ अशा प्रकारचे आंदोलनातील पोस्टर सध्या चर्चेचा विषय बनले होते.
Rupali Chakankar VS Rupali Thombare Patil: चुकीच्या स्टेटमेंट मध्ये मी त्यांची बाजू नाही घेऊ शकत
हा वाद मी राष्ट्रवादी पक्षात आल्यानंतर झाला. माझी कामाची जी पद्धत आहे मला सगळ्यांना एकत्र घेऊन काम करायला आवडतं. आणि काम करत असताना मी समोरच्याला शत्रू समजत नाही. मग ती मैत्री होते. विरोधी पक्षातील जरी कोणी असेल तरी माझी त्यांच्याशी चांगली मैत्री होते. आता त्या दोस्तीमध्ये चाकणकर बाईंना काही चुकीचं वाटत असेल किंवा चाकणकरांच्या सातत्याने येणाऱ्या चुकीच्या स्टेटमेंट मध्ये मी त्यांची बाजू नाही घेऊ शकत. कारण तुम्ही समाजविरोधी किंवा जे कायद्याला धरून नाही असं जर तुम्ही महत्त्वाच्या पदावर बसून बोलणार असाल तर मी कशी त्यांची बाजू घेणार? ज्यांना त्यांची बाजू बरोबर वाटते त्यांनी त्यांची बाजू घ्यावी. तो राग त्यांना आहे. तो राग त्यांना असला तरी माझा त्यांच्याशी असा काही संबंध येत नाही. कारण मी प्रवक्ता म्हणून काम करत होते. त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. परंतु पक्षातील ज्या काही महिला आहेत, त्यांना रूपाली चाकणकरांनी पदावरनं काढलं, काम न करू देत नाहीत अशा अनेक गोष्टी आहेत, त्याच्या तक्रारी देखील माझ्याकडे आल्या होत्या. मात्र मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही या तुमच्या तक्रारी सुनील तटकरे आणि अजित पवार किंवा सुनेत्रा पवार यांच्याकडे द्या. हेच या तक्रारींचा निवारण करू शकतात. प्रवक्ता म्हणून मी माझ्या पक्षाची बाजू मांडणे एखाद्या गोष्ट समजून सांगणे ते मला उपजत जमत त्याला मी काय करू शकत नाही. त्यात मी वकील आहे, मला जर एखादी घटना तुम्ही सांगितली तर मी त्याबाबत कायद्याच्या किती त्रुटी आहेत, कायदेशीर किती आहे हे समजतं. त्यांना त्याचा रोष असेल तर मी काहीच करू शकत नाही.
Rupali Chakankar VS Rupali Thombare Patil: आओ शिकार करके जाओ, मी तशी नाही…
मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर पक्षातील इतर ज्या जुन्या 25-25 वर्ष काम करणाऱ्या पक्षातील महिला आहेत, त्यांच्यासोबत माझं छान जमतं. पण या मॅडमला ते जमत नाही. तो त्यांचा रिपो नाही आणि तसंही मी त्यांच्याशी काही बोलायला जात नाही. हा एकच रोष आहे. त्यांचं पक्षातील वागणं आपण पक्षातील इतर महिलांना विचारलं तर त्या मीडियामध्ये यायला घाबरतात. त्या महिलांनी त्याचा तक्रारी सुनील तटकरे यांच्याकडे दिल्या होत्या, त्या कोणत्याही तक्रारींचं निवारण करण्यात आलेलं नाही. माझ्यासमोर त्या महिलांवर अन्याय होत होता. त्या पक्षातील महिला त्यांचा न्याय प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे मागत होत्या. माझा त्याच्यात काहीच रोल नव्हता. शांत बघत होते. ज्याप्रमाणे त्या महिलांना त्रास देणे सुरू होतो तसंच माझी शिकार करण्याची त्या प्रयत्न करत असतील तर मी अशी नाही. आओ शिकार करके जाओ, तुम्ही संविधानिक पदावर बसलेले आहेत. या राजकारणात कोणताही मंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, मंत्री असतील, यांना कोणताही अधिकार दिलेला नाही की त्या पदावर जाऊन तुम्ही लोकांना त्रास द्यायचा. चाकणकरांचा खूप घाण वागण्याचा विषय म्हणजे त्या आपल्याच पक्षातील लोकांमध्ये बाहेरच्या आणून त्यांना तयार करून जी तक्रार दाखल करता येत नाही ती तक्रार दाखल करायला लावणे, षडयंत्र रचने. आम्ही पक्षात १९ जण प्रवक्ते आहोत. जर मी म्हणलं की मी प्रवक्त आहे, 19 जण द्यायची नाहीत. आणि जर मी म्हटलं की ह्या 19 जणांनी माझ्या अधिकाराखाली वागायचं. असं चालत नाही. हा पक्ष आहे. असं चाकणकर पक्षामध्ये घडवत आहेत. त्रास होणाऱ्या लोकांनी त्यांची तक्रार प्रांताध्यक्षांकडे केलेली आहे. त्याच्यावर कारवाई झाली नाही त्यामुळेच हा विषय इतका मोठा झाला आणि उद्रेक झाला. ही कारवाई त्याच वेळी झाली असती तर आज ही वेळ आली नसती असंही रूपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.