पवार काका-पुतणे एकत्र येणार? पिंपरी चिंचवडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पहिलं पाऊल, अजितदा


पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पवार काका-पुतणे एकत्र येतील, असे संकेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे (NCP Sharad Pawar) आमदार रोहित पवारांनी (Rohit pawar) दिले आहेत. त्यानंतर पिंपरी चिंचवडचा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं एक पाऊल पुढं टाकलं आहे. भाजपवरचा राग व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना सत्तेतून पाय उतार करण्यासाठी आम्ही एक पाऊल मागे घेऊ. जागांच्या वाटाघाटीत नमतं घेऊ, वरिष्ठांकडे तसा प्रस्ताव ही पाठवू, असं म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांच्या राष्ट्रवादी (NCP Ajit Pawar) सोबत आघाडी करण्याची तयारी दर्शवली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी एबीपी माझाशी बोलताना याबाबत सविस्तर भाष्य केलं आहे.(NCP Ajit Pawar)

NCP Pune Politics: कुठल्या-कुठल्या पक्षाला सोबत घ्यायचे याचा निर्णय वरिष्ठांचा

भाजपाला थांबवण्यासाठी जे शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे पक्ष आहेत. जे आमच्या विचारांचे पक्ष आहेत. त्यांच्यासोबत आमची युती होऊ शकते. म्हणजेच महाविकास आघाडी होऊ शकते, म्हणून महाविकास आघाडीमध्ये कुठल्या-कुठल्या पक्षाला सोबत घ्यायचे याचा निर्णय वरिष्ठांचा असला तरीही आम्ही भाजपच्या विरोधात जे आमच्यासोबत येतील त्यांना सोबत घ्यायला आम्ही तयार आहोत, असंही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी म्हटलं आहे.

NCP Pune Politics: आम्ही थोडा कमीपणा घेऊ पण भाजपाला थांबवू

त्याचबरोबर अद्याप आम्हाला तसे संकेत आलेले नाहीत. महाविकास आघाडी म्हणून ते आमच्या सोबत येणार असतील. भाजपचे विचार सोडून त्याच्या विरोधामध्ये ते आमच्या सोबत येणार असतील तर शंभर टक्के आमचा हात पण पुढे असेल. ज्या भ्रष्टाचाराने भाजपाने आपल्या शहराचा वाटोळ केले, त्यांच्या विरोधामध्ये आम्ही ताकतीने लढणार आणि त्यांना थांबवणार त्यासाठी एक पाऊल मागे येण्याची पण आमची तयारी असेल जागावाटप असेल किंवा बाकी कोणते विषय असतील त्यामध्ये आम्ही थोडा कमीपणा घेऊ पण भाजपाला थांबवू असे संकेत आमचे आहेत, असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी म्हटलं आहे.

NCP Pune Politics: अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यासाठी एक पाऊल पुढे जाऊ

भाजपाला थांबवण्यासाठी शरद पवार असतील, शशिकांत शिंदे असतील, सुप्रिया सुळे असतील यांच्याशी चर्चा करून आम्ही पुढचा निर्णय घेऊ. अशाप्रकारे जागांच्या वाटाघाटीमध्ये काहीशा कमी जागा घेऊन आम्ही भाजपविरोधात लढणाऱ्यांसाठी आम्ही एक पाऊल मागं येऊ असं म्हटलं आहे, परंतु अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यासाठी एक पाऊल पुढे जाऊ असं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने म्हटलं आहे. आता अजित पवारांची राष्ट्रवादी याबाबत काही निर्णय घेते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपशी दोन हात करतात का? हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे.

आणखी वाचा

Comments are closed.