तुमचं स्किनकेअर रुटीन काय?; हरलीन देओलचा नरेंद्र मोदींना प्रश्न, पंतप्रधान लाजले अन् म्हणाले…
हरलीन कौरने पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्किनकेअर रूटीन विचारले: भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला वनडे विश्वचषक 2025 ची ट्रॉफी जिंकल्यानंतर 5 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या (Indian team to meet PM Narendra Modi News) निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी (पंतप्रधान नरेंद्र मोदी) सर्व खेळाडूंशी गप्पा मारल्या. आता या संपूर्ण भेटीचा व्हिडिओ आता शेअर करण्यात आला आहे. या संवादादरम्यान पीएम मोदींनी महिला खेळाडूंना अनेक मजेशीर प्रश्न विचारले. त्यातच टीमची स्टार क्रिकेटर हरलीन देओलने असा एक प्रश्न विचारला की, ज्याचं उत्तर जाणून घेण्यासाठी सगळ्यांचीच उत्सुकता वाढली.
तुमचं स्किनकेअर रुटीन काय?; हरलीन देओलचा नरेंद्र मोदींना प्रश्न
संवादादरम्यान पंतप्रधान मोदींनी हरलीन देओलच्या खेळातील चिकाटी आणि उच्च दडपणाच्या क्षणी दाखवलेल्या धैर्याची प्रशंसा केली. त्यावर हरलीनने हसतच विचारले की, “सर, तुमचा स्किनकेअर रूटीन काय आहे? तुम्ही खूप ग्लो करता…” तिचं हे वाक्य ऐकताच सर्व भारतीय खेळाडूं हसू लागले.
स्वतः पंतप्रधान मोदींही हसून म्हणाले, “माझं या विषयाकडे फारसं लक्ष गेलं नव्हतं.” तेवढ्यात स्नेह राणा हसत म्हणाली, “सर, हा ग्लो म्हणजे देशातील कोट्यवधी लोकांच्या प्रेमाचा परिणाम आहे.” संघाचे प्रशिक्षक अमोल मजूमदारही हसत म्हणाले, “पाहा सर, याच खोडकर खेळाडूंमुळे मला रोज संघर्ष करावा लागतो, म्हणूनच माझे केस पांढरे झाले आहेत.”
#पाहा | दिल्ली: क्रिकेटपटू आणि चॅम्पियन भारतीय क्रिकेट संघाची सदस्य, हरलीन कौर देओलने पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या त्वचेच्या काळजीबद्दल विचारले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, “मी याकडे फारसे लक्ष दिले नाही… मी 25 वर्षे सरकारमध्ये आहे. pic.twitter.com/deqCTZcCAE
— ANI (@ANI) 6 नोव्हेंबर 2025
भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय
2 नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या महिला वनडे विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत पहिल्यांदाच आयसीसी ट्रॉफी आपल्या नावे केली. याआधी भारताने 2005 आणि 2017 मध्येही विश्वचषकाच्या अंतिम फेरीत मजल मारली होती, पण दोन्ही वेळा संघाला पराभव पत्करावा लागला होता. मात्र या वेळी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील ‘वाघिणींनी’ कमाल करत दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून इतिहास रचला.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.