नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना; पण भारत-पाक सामना कुठे?, ‘या’ 5 शहरात रंगणार टी-20 वर्ल्डक
T20 विश्वचषक 2026 स्थळाचे अपडेट: भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या टी20 विश्वचषक 2026 स्पर्धेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या विश्वचषकाचा अधिकृत सामना वेळापत्रक (T20 World Cup 2026 Schedule) लवकरच आयसीसीकडून जाहीर होणार आहे. त्याआधी काही प्रमुख स्थळांची (T20 World Cup 2026 Venue) नावे निश्चित झाल्याचे वृत्त समोर आले आहे. रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची याबाबत बैठक झाली असून, 2023 च्या वनडे वर्ल्ड कपच्या तुलनेत या स्पर्धेतील सामने कमी शहरांमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार अंतिम सामना (Narendra Modi stadium in Ahmedabad shortlisted to host final)
रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या बैठकीत प्रत्येक मैदानावर सुमारे 6 सामने घेण्याचं ठरलं आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने 5 शहरांची निवड केली आहे, ज्यामध्ये अहमदाबाद, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई आहे. तसेच, अंतिम सामना (T20 World Cup 2026 Final) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाण्याची शक्यता आहे.
श्रीलंकेतील सामने कुठे होतील?
टी-20 वर्ल्ड कप 2026 भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. श्रीलंकेत तीन मैदानांवर सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या त्या तीन मैदानांची अधिकृत नावे स्पष्ट झालेली नाहीत.
🚨 नरेंद्र मोदी T20I वर्ल्ड कप फायनलचे यजमानपद स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे 🚨
– भारतातील अहमदाबाद, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई ही शॉर्टलिस्ट केलेली ठिकाणे आहेत. [Devendra Pandey From Express Sports]
प्रत्येक ठिकाणी प्रत्येकी 6 सामने होण्याची शक्यता आहे. pic.twitter.com/jg1tSI8VXS
– जॉन्स. (@CricCrazyJohns) 6 नोव्हेंबर 2025
महिला वर्ल्ड कपच्या मैदानांना वगळलं
अहवालानुसार, महिला वनडे वर्ल्ड कप 2025 मध्ये जे मैदान वापरले गेले होते, त्या मैदानांना टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी वगळण्यात आलं आहे. म्हणजेच गुवाहाटी, विशाखापट्टणम, इंदौर आणि नवी मुंबई ही चार ठिकाणं या यादीत नाहीत. तसंच बंगळुरू आणि लखनऊ या शहरांचा विचार झाला की नाही, हेही स्पष्ट झालेलं नाही.
भारत आणि पाकिस्तान कुठे आमनेसामने येणार? (भारत-पाकिस्तान सामना T20 विश्वचषक 2026 कुठे आहे)
पाकिस्तान संघ जर भारतासमोर किंवा इतर कोणत्याही संघासमोर सेमीफायनल किंवा फायनलमध्ये आला, तर तो सामना न्यूट्रल वेन्यूवर म्हणजेच श्रीलंकेत खेळवला जाईल. तसेच भारत-पाकिस्तानचा लीग सामना किंवा नॉकआउट सामना देखील श्रीलंकेतच होणार आहे. आयसीसीने बीसीसीआयला हेही स्पष्ट केले आहे की, जर श्रीलंका संघाने सेमीफायनल गाठला, तर त्यांचा सामना कोलंबोमध्येच खेळवला जाईल.
या सर्व बाबींचा विचार करूनच अंतिम वेळापत्रक तयार केले जाणार आहे. टी20 विश्वचषक 2026 साठी सर्व 20 संघ निश्चित झाले आहेत, आणि ही स्पर्धा फेब्रुवारी-मार्च 2026 दरम्यान पार पडेल. बीसीसीआयने आपला प्रारंभिक शेड्यूल प्रस्ताव आयसीसीकडे सुपूर्द केला असून, लवकरच त्यावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.