इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा शाही साखरपुडा, ट्रोलर्सवर भडकले नितेश राणे; म्हणाले इतर धर्मातही..
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नावर नितेश राणे : आपल्या नर्मविनोदी आणि थेट शैलीतून समाजातील विविध प्रश्नांवर प्रबोधन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar Maharaj) हे सध्या त्यांच्या कन्येच्या साखरपुड्याच्या सोहळ्यामुळे चर्चेत आले आहेत. ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा साखरपुडा नुकताच संगमनेर (Sangamner) येथील वसंत लॉन्स येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत असून, यावरून समाजातील विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. लग्न सध्या पद्धतीने करा, असा संदेश देणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी आपल्याच लेकीचा शाही साखरपुडा केल्याने त्यांना समाजमाध्यमावर ट्रोल केले जात आहे. आता यावरून मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे (Niesh Rane) हे ट्रोलर्सवर भडकल्याचे पाहायला मिळत आहे.
Nitesh Rane on Indurikar Maharaj Daughter Engagement: काय म्हणाले नितेश राणे?
मंत्री नितेश राणे यांनी नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांना शाही साखरपुड्यावरून इंदुरीकर महाजारांवर होत असलेल्या टिकेबाबत विचारले असता नितेश राणे म्हणाले की, प्रत्येक बाबतीत आमच्या कीर्तनकारांबाबत टीका करू नका. इतर धर्मात देखील मोठे लग्न आणि कार्यक्रम होतात, असे म्हणत त्यांनी ट्रोलर्सवर संताप व्यक्त केला.
Nitesh Rane on Kumbh Mela 2027: कुंभमेळ्यामध्ये फक्त हिंदूंचीच दुकाने लागली पाहिजे
दरम्यान नितेश राणे यांनी कुंभमेळ्यामध्ये फक्त हिंदूंचीच दुकान लागली पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, कुंभमेळ्यामध्ये फक्त हिंदूंचे दुकाने लागली पाहिजे. हे कशाला दुकाने लावतात. आम्ही मस्जिद बाहेर दुकान लावतो का? तुम्हाला जर आमचे नियम मान्य नसले तर मग इथे राहू नका. कुंभमेळ्यामध्ये हिंदूंचे दुकाने लागली पाहिजे, ही मागणी नाहीतर तर हे झालेच पाहिजे. आपल्या देशात राहणारा प्रत्येक व्यक्ती देशभक्त असला पाहिजे. मुस्लीम देशभक्तांबाबत आम्हाला काहीच अडचण नाही. पण जिहादीवाले जे हिरवे साप आहेत, त्यांच्यावर आमचा आक्षेप आहे. मौलाना हा डुप्लिकेट विषय असतो, असे नितेश राणे यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा, व्हिडिओ व्हायरल; काय करतो होणारा जावई?
आणखी वाचा
Comments are closed.