मुंबई इंडियन्सचा हरमनप्रीत कौरबाबत मोठा निर्णय, रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर


मुंबई : विमेन्स प्रीमियर लीग 2026 साठी सर्व संघांनी रिटेन्शन यादी जाहीर केली आहे. प्रत्येक संघाला पाच खेळाडू रिटेन करण्याची परवानगी होती. यामध्ये तीन भारतीय आणि दोन विदेशी खेळाडूंना रिटेन करावं लागणार होतं. मुंबई इंडियन्सनं पुन्हा एकदा वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरवर विश्वास दाखवला आहे. मुंबईनं पाच खेळाडूंना रिटेन केलं त्यात हरमनप्रीत कौरचा समावेश आहे. याशिवाय भारतीय संघाची खेळाडू अमनजोत कौर हिला देखील मुंबईनं रिटेन केलं आहे. या दोघींशिवाय मुंबईनं नैट-साइवर ब्रंट आणि हेली मॅथ्यूज या दोन्ही विदेशी खेळाडूंना रिटेन केलं. तर नवख्या जी कमलिनी हिला देखील मुंबईनं रिटेन केलं. डब्ल्यूपीएल 2026  साठी ऑक्शन 27  नोव्हेंबरला होणार आहे.  मुंबई इंडियन्सच्या  संघमालक निता अंबानी यांनी मुंबईनं रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली.

बीसीसीआयनं ऑक्शनसाठी सर्व संघांना ऑक्शन पर्सची मर्यादा 15 कोटी निश्चित केली होती. रिटेन्शन साठी वेगवेगळी रक्कम निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या रिटेन्शनसाठी साडेतीन कोटी, दुसऱ्या रिटेन्शनसाठी अडीच कोटी, तिसऱ्या  रिटेन्शनसाठी पावणे दोन कोटी, चौथ्या रिटेन्शनसाठी एक कोटी आणि पाचव्या रिटेन्शनसाठी 60  लाख रुपये निश्चित केले होते.

मुंबई इंडियन्सची रिटेन्शन यादी

वर्ल्ड कप विजेत्या हरमनप्रीत कौरला मुंबई इंडियन्स पहिलं रिटेन केलं नाही. मुंबईनं नैट साईवर ब्रंटला पहिलं रिटेन केलं. तिच्यासाठी मुंबईनं साडेतीन कोटी रुपये मोजले. हरमनप्रती कौरला अडीच कोटी रुपये मुंबईनं मोजले. हेली मॅथ्यूजसाठी पावणे कोटी मुंबईनं मोजले. तर भारताची स्टार ऑलराऊंडर अमनजोत कौरला एक कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं. तर, मुंबईच्या 17 वर्षांच्या जी कमलिनी या अनकॅप्ड खेळाडूला रिटेन केलं असून तिला 60 लाख रुपये मिळतील.

Nate Sciver Brunt – 3.50 कोटी
हरमनप्रीत कौर – 2.50 कोटी
हेली मॅथ्यूज – 1.75 कोटी
अमनजोत कौर – 1 कोटी
जी कमलिनी – ६० लाख

मुंबईनं दोनवेळा जिंकली स्पर्धा

मुंबईनं डब्ल्यूपीएल दोन वेळा जिंकली आहे. मुंबईनं 2023 आणि 2025 मध्ये डब्ल्यूपीएल जिंकलं. 2025 च्या डब्ल्यूपीएलच्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सला 8 धावांनी पराभूत केलं होतं.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.