पार्थ पवारांनी दिग्विजय पाटलांना सहीचे अधिकार दिल्याचा ठराव समोर; जमीन घोटाळाप्रकरणी सगळ्यात मो


पार्थ पवार जमीन घोटाळा पुणे : पुण्यातील मुंढवा भागातील 1800 कोटींची जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ 300 कोटींमध्ये घेतली. तसंच यासाठी स्टँप ड्युटी म्हणून केवळ 500 रूपये मोजल्याचं समोर आलं आहे. सदर वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणात (Parth Pawar Land Scam Pune) पार्थ पवार (Parth Pawar) याचे मामेभाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील  यांच्यासह आतापर्यंत 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी महत्वाची माहिती समोर आली आहे.

अमेडिया कंपनीकडून खाजगी एलएलपी आयटी कंपनी उभारली जाणार होती. यासाठी जी खरेदी विक्री केली जाणार होती, त्याच्या सहीचे अधिकार पार्थ पवारांनी दिग्विजय पाटील (Digvijay Patil) यांना देण्याचा 22 एप्रिल 2025ला प्रस्ताव ठेवण्यात आला. या प्रस्तावाची प्रत आता समोर आलीये. या प्रस्तावानंतर 20 मे 2025 ला वादग्रस्त जमिनीचा दस्त झाला. हा दस्त दिग्विजय पाटलांच्या सहीने झाला असून पार्थ पवारांनी सहीचे दिलेल्या अधिकाराची प्रतही सोबत जोडण्यात आलेली आहे.

दस्तावर पार्थ पवारांची सही? बावधन पोलिसांच्या हाती दस्त- (Parth Pawar Land Scam Paper)

पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीने खरेदी केलेला दस्त बावधन पोलिसांनी हस्तगत केलाय. हा दस्त करताना पार्थ पवार बावधनच्या दुय्यम निबंधक कार्यालयात आले होते का? स्वतः पार्थ पवारांनी दस्तावर सही केलीये का? शीतल तेजवानीचं कुलमुखत्यार पत्र ताब्यात घेतलं का? या सर्वांचा खुलासा या दोन तासांच्या छापेमारीतून होणार आहे.

नेमका घोटाळा काय? (Parth Pawar Land Scam Pune)

1. शितल तेजवानींनी नुसत्या पॉवर ऑफ एटर्नीवर कोट्यवधींची जमीन विकली.

2. 16.19 हेक्टर जमिनीच्या 300 कोटींच्या व्यवहारावर फक्त 500 रु. मुद्रांक शुल्क घेतले.

3. सूची 2 मध्ये मुंढवा पुणे शहरात असतानाही सोयीसाठी मुळशी तालुक्यात दाखवले.

4. सूची 2 मध्ये अमेडिया एंटरप्रायजेसच्या दिग्विजय पाटलांचे लिंग स्त्री असे लिहले.

5. 1 टक्के मालकी असलेल्या दिग्विजय पाटलांवर गुन्हा, 99 टक्के मालकी असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा नाही.

कोण आहेत दिग्विजय पाटील? (Who Is Digvijay Patil Land Scam)

१. धाराशिव जिल्ह्यातल्या तेर गावचे मूळचे रहिवासी…

2. पार्थ पवार यांचे मामा अमरसिंह पाटील यांचे दिग्विजय हे पुत्र…

3. दिग्विजय पाटील सध्या पुण्यात वास्तव्यास.

4. तेरमधली वडिलोपार्जित जमीन कसण्यासाठी, कौटुंबिक कार्यक्रम, मतदानासाठी जातात तेरला.

5. सध्या तेरामध्ये दिग्विजय पाटलांच्या कुटुंबातल्या कोणाचेही वास्तव्य नाही.

कोण आहे शीतल तेजवानी?, वादग्रस्त इतिहास काय? (Who Is Sheetal Tejawani)

1.शीतल तेजवानी आणि सागर तेजवानी हे पती-पत्नी आहेत.

2. सागर सुर्यवंशीने शितल तेजवानीसह कुटुंबियांच्या नावे घेतली 10 कर्जे

3. 41 कोटी रुपयांची 10 कर्जे घेताना सागर-शितलने सादर केली बनावट कागदपत्रे

4. सेवा विकास बँकेच्या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या शाखांतून उचलले कर्ज

5. ज्या कारणांसाठी कर्जे घेतली तिथे ती न वापरता दुसऱ्याच व्यवसायात वापरली

6. 2019 ला सहकार सह आयुक्त राजेश जाधवरांच्या ऑडिटमध्ये शितल-सागरचा घोटाळा उघड

7. सागर सुर्यवंशीने आणि शीतल तेजवानीने घेतलेली कर्जे मुद्दाम फेडली नाही

8. 31 मार्च 2021 पर्यंत कर्जांची रक्कम 60 कोटीच्या घरात

9. जानेवारी 2023 मध्ये ईडीकडून सागर सूर्यवंशीच्या घर आणि कार्यालयावर छापा

10. सागर सूर्यवंशीच्या 45 कोटींच्या मालमत्ता जप्त, मे 2023 मध्ये स्पेशल कोर्टात खटला

11. सागर सुर्यवंशीला ऑक्टोबर 2021मध्ये आधी सीआयडीने आणि नंतर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक

12. जामिनावर बाहेर येताच सागर सूर्यवंशीला जून 2023मध्ये ईडीकडून अटक

संबंधित बातमी:

Parth Pawar Land Scam Pune Ajit Pawar: पुण्यातील जमीन, मुंबईतून सूत्रं फिरली; पार्थवर नेम ठेवून अजितदादांचा गेम कोण करतंय?

महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?

आणखी वाचा

Comments are closed.