रुपाली ठोंबरेंना धक्का, चाकणकरांवर टीका करणं पडणार महागात? पक्षाकडून नोटीस, ७ दिवसांच्या आत…


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षातील रूपाली ठोंबरे पाटील (rupali thombre Patil) आणि रूपाली चाकणकर ( rupali chakankar) यांच्यातील संघर्ष गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. रूपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष असून त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सुद्धा आहेत. तर रूपाली पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रदेश प्रवक्ता पदाची जबाबदारी आहे. एकाच पक्षातील महिला नेत्यांमधील वाद टोकाला गेला आहे. अशातच रुपाली ठोंबरे (rupali thombre Patil) यांना पक्षाची शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत नोटीस पाठवण्यात आली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबाबत प्रसारमाध्यमांत केलेलं वक्तव्य हे पक्षशिस्त भंग करणारे आहे, पक्षाचे संघटन सरचिटणीस संजय खोडके यांनी नोटिस बजावत ७ दिवसांच्या आत खुलासा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.