आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होणार? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, थेट मोदी-शाहांचं नाव घेतलं
संभाजीनगर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Election) जाहीर झाल्या असून महापालिकांच्या निवडणुकांसाठी अद्याप वाट पाहावी लागणार आहे. मात्र, सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली असून शिवसेना पक्षानेही मनसेला सोबत घेऊन मुंबई जिंकायची रणनीती आखली आहे. त्यातच, आता मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यास आदित्य ठाकरेंना महापौर बनवण्यात येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. माध्यमांत आलेल्या या चर्चेवर उद्धव उद्धव ठाकरे स्पष्टीकरण देत भाजपला जोरदार टोला लगावला. तसेच, आदित्य ठाकरे महापौर होण्याचे वृत्त त्यांनी फेटाळून लावले आहे.
शिवसेना कंटाळा आला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर असून ते शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. अतिवृष्टीनंतर सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांना मिळाली की नाही, याचा आढावा ते बांधावर जाऊन घेत आहेत. याचदरम्यानआयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्या महापौर पदाबाबतच्या प्रश्नावर सडेतोड उत्तर दिलं. या बातमीचा उगम कुठून झाला हे मला कळून घ्यायचं आहे आणि मला ते कळलं आहे. या अफवेचा उगम संघातून झाला, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. तसेच, अहमदाबादहून बोट बदलायचं आहे आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमर्याद sh१h यांना अहमदाबादचा महापौर बनवावं लागेल, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. आता मला बघायचं आहे, अहमदाबादचा महापौर अमित शहा होणार की नरेंद्र मोदी? अशी खोचक टीकाही उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली.
भ्रष्ट जनता पक्ष म्हणत भाजपवर निशाणा
उद्धव ठाकरेंनी मराठवाडा दौऱ्यात शेतकऱ्यांना हेक्टरी 50 एक हजार मदत द्या, कर्जमाफी करा, पीक विमाचे पैसे द्या अशी मागणी केली. तसेच, सरकारने जाहीर केलेली मदत आधी द्यावी, असेही ते म्हणाले. पार्थ पवार, मुरलीधर मोहोळ, प्रताप सरनाईक यांचं काय होणार? पुढे काहीच झाल नाही. भ्रष्ट जनता पक्ष भ्रष्टाचार केलेल्या लोकांना भाजपसोबत घेतेय, असे म्हणत पार्थ पवार प्रकरणावरुन भाजपला लक्ष्य केलं.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.