रूपाली चाकणकरांवर टीका केल्यानं पक्षाकडून नोटीस; रुपाली ठोंबरे म्हणाल्या, ‘खुलासा पत्रामध्ये हे
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षातील रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre) आणि रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यातील संघर्ष गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष असून त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सुद्धा आहेत. तर रूपाली पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रदेश प्रवक्ता पदाची जबाबदारी आहे. एकाच पक्षातील महिला नेत्यांमधील वाद टोकाला गेला आहे. अशातच रुपाली ठोंबरे यांना पक्षाची शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत नोटीस पाठवण्यात आली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबाबत प्रसारमाध्यमांत केलेलं वक्तव्य हे पक्षशिस्त भंग करणारे आहे, पक्षाचे संघटन सरचिटणीस संजय खोडके यांनी नोटिस बजावत ७ दिवसांच्या आत खुलासा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याप्रकरणी रूपाली ठोंबरे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, मला पक्षाची नोटीस नाही तर खुलासा पत्र काल रात्री दिलं आहे. रूपाली चाकणकर यांच्या बाबतीत माध्यमावर जे वक्तव्य केलं त्याच्या बाबतीतला खुलासा मला माझ्या पक्षाने मागितला आहे, असं ठोंबरेंनी म्हटलं आहे.तर यावर कायदेशीर खुलासा आणि त्या पत्राला उत्तर मी देणार आहे. माझा बचाव किंवा सत्य मी खुलासामधून मांडेल. मी कायदेशीर खुलासा करेल, असं त्यांनी म्हटलं आहे.(Rupali Chakankar)
Rupali Patil Thombare: आधी तक्रारी मागे घेतल्या मग गुन्हा दाखल का केला
तर काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या माधवी खंडाळकर यांच्या व्हिडीओ आणि मारहाण आरोपाच्या प्रकरणावर बोलताना रूपाली ठोंबरे म्हणाल्या, यांनी कुणाला कॉल केले याचे सीडीआर मी काढणार. पोलीस स्टेशनमध्ये वाद गेल्यानंतर सुरुवातीला तो वाद संपला होता त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला, सीपीं (CP )ना तक्रार दिल्यानंतर पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला. आधी तक्रारी मागे घेतल्या मग गुन्हा दाखल का केला. मी देखील माधवी खंडाळकर यांच्यावर 354 चा गुन्हा दाखल केला आहे. त्या आज अजित पवारांना भेटल्या त्यांना कुणीही भेटू शकता. माधवी खंडाळकर यांनी जो गुन्हा दाखल केला तो कुणाच्या सांगण्यावरून दाखल करण्यात आला याचा तपास करावा अशी विनंती सीपींना CP विनंती केली आहे, अशी माहिती देखील ठोंबरेंनी केली आहे.
Rupali Patil Thombare: माझ्या खुलासा पत्रामध्ये हे सगळे पुरावे देणार
मी त्यांच्या आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागितला आहे पक्ष आणि आयोग वेगळा आहे. या आधी देखील सोशल मीडियावर माझ्या विरोधात पोस्ट केली होती, ती मुलगी देखील रूपाली चाकणकर यांचीच होती. स्नेहल चव्हाण असं त्या मुलीचं नाव आहे. हे सगळे पुरावे सुनील तटकरे आणि अजित पवार यांना दिले आहेत. माझ्या खुलासा पत्रामध्ये हे सगळे पुरावे देणार आहे. माधवी खंडाळकर त्या व्हिडिओमध्ये रूपाली चाकणकर यांना फोन लावा असे देखील म्हणत आहेत, मग रूपाली चाकणकर यांचा संबंध नसताना त्यांना का फोन लावण्यात आला, असा सवाल देखील रूपाली ठोंबरे यांनी उपस्थित केला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.