सोन्याच्या दरात उच्चांकानंतर 10  टक्क्यांची घसरण,गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती, तज्ज्ञ म्हणतात..


सोन्याचा आजचा भाव मुंबई : सोने आणि चांदीच्या दरात ऑक्टोबर महिन्यात जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. 24 कॅरेट सोन्याचे एका तोळ्याचे दर 1 लाख 34 हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.  सोन्याच्या दरात मोठी घसरण होत दर कमी झाले होते. सोन्याचे एका तोळ्याचे दर सध्या 120000 ते 121000 रुपयांदरम्यान आहेत. त्यामुळं गुंतवणूकदारांच्या मनात सोन्याचे दर येत्या काळात वाढणार की कमी होणार असा प्रश्न आहे. सोन्यात ज्यांनी दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून गतवर्षी गुंतवणूक केली असेल त्यांना चांगला फायदा झाला आहे. आता दरातील तेजी आणि घसरणी दरम्यान गुंतवणूक करावी का असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात आहे.

सोन्याच्या दरात घसरण का होतेय?

ऑक्टोबर मह्न्यात सोन्याच्या दरानं डिसेंबर 2024 च्या तुलनेत 54 टक्के उच्चांक गाठला होता. सोन्याचे दर 1 लाख 34 हजारांवर पोहोचल्यानंतर सोन्याचे दर घसरले आहेत. याचं कारण गुंतवणूकदारांनीकडून नफा कमावण्याचं धोरण राबवण्यात आलं. त्यामुळं सोन्याचे दर घसरले. इस्त्रायल आणि  हमास यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानं देखील त्याचा बाजारावर परिणाम झाला. बाजारातील अस्थिरता कमी झाला. सोन्याकडे सुरक्षित पर्याय म्हणून गुंतवणूकदार पाहतात. जागतिक स्तरावरील बाजारातील अस्थिरता कमी झाल्यानं  त्यात घसरण पाहायला मिळाली.

सोन्याच्या दरात घसरण कमी होऊन देखील केंद्रीय बँकांकडून  सोने खरेदी सुरु आहेत. यंदाच्या तिसऱ्या तिमाहीत केंद्रीय बँकांनी मिळून 220 टन सोने खरेदी केलं आहे. पोलंड. भारत आणि उझबेकिस्तानकडून सर्वाधिक खरेदी करण्यात आली आहे. जगभरात देश आता डॉलर्स सह सोन्याला प्राधान्य देत आहेत.

भारतीय बाजारात दसरा आणि दिवाळी झाल्यानंतर सोन्याची मागणी घटली आहे. त्यामुळं दागिण्यांची मागणी वार्षिक आधारावर 16 टक्क्यांनी घसरली आहे. ग्राहक सोन्याची नाणी, ईटीएफकडे वळत आहेत.

सोन्यात गुंतवणूक करावी का? तज्ज्ञ म्हणतात..

काही गुंतवणूकदारांना सोन्यातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळाला आहे.  ते विक्री करुन नफा बुक करु शकतात. येत्या काळात सोन्यात आणखी घसरण झाल्यास सोनं खरेदी करणं सोपं होईल. याशिवाय काही तज्ज्ञांच्या मते गोल्ड ईटीएफ मध्ये एसआयपी किंवा सॉवरेन गोल्ड बॉण्ड चांगला पर्याय आहे.

सोन्याचा दर किती रुपयांवर?

मुंबईतील 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 117970 रुपयांवर पोहोचला आहे.  तर, 22 कॅरेट सोन्याचा दर  112350 रुपयांवर पोहोचला आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 562 रुपयांची घसरण झाली आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.