इकडे तानाजी सावंतांची मित्रपक्ष राष्ट्रवादीवर आगपाखड; सत्तेशिवाय राहूच शकत नाही म्हणत हल्लाबोल,
धाराशिव: धाराशिवमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना घेरण्यासाठी मित्रपक्षांसह विरोधकही एकवटले आहेत. भूम परंडा नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसोबत लढण्याची चिन्ह आहेत. अजित पवार गटाचीही त्याला साथ आहे. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांची रणनीतीसाठी बैठक झाली. त्यानंतर सावंतांनी ही एकला चलो रे चा नारा दिला. भाजप शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी अ ब क ड सर्वांना आमच्या विरोधात एकत्र यावं लागतं यातच आमचा विजय आहे.आम्हाला फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया यानंतर सावंत यांनी दिली. (Tanaji Sawant)
Tanaji Sawant: तानाजी सावंत यांना घेरण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र
भूम, परंडा नगरपरिषदेत आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना घेरण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र आल्याचं चित्र दिसून येत आहे. भाजप, शिवसेना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी आमदार तानाजी सावंतांविरोधात एकत्र नगरपरिषद निवडणूक आखाड्यात उतरणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात रणनीतीसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. तर एकला चलो रे जरा नारा शिवसेनेने दिला नाही मोठ्या पक्षाने आम्हाला विश्वासात घेतले नाही, त्यामुळे आमची गाफील न राहता तयारी सुरू आहे, असं तानाजी सावंत यांनी स्पष्ट केले आहे. भाजप, शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी अ ब क ड सर्वांना आमच्या विरोधात एकत्र यावं लागतं यातच आमचा विजय आहे, आम्हाला फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया सर्वपक्षीय एकजुटीवर तानाजी सावंत यांनी दिली आहे.
Tanaji Sawant: तानाजी सावंत यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेसवर आगपाखड
तर माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आगपाखड केली आहे. ही राष्ट्रवादीची अशी औलाद आहे ती सत्तेशिवाय राहू शकत नाही. पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर कसा तडपडतो तसं राष्ट्रवादीला होतं, या दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, मी सांगत होतो याचा प्रत्यय तुम्हाला गेल्या महिन्याभरात आला असेल. महाराष्ट्रात एकमेव आमदार मी आहे. मी सांगितलं होतं दोन्ही दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत. हिंदुत्व त्यांनी स्वीकारलं का?, हिंदुत्व मान्य आहे का? मांडीला मांडी लावून बसतात युतीची तत्त्व मान्य नसतील तर तुम्ही कशासाठी आमच्यावर त्यांना लादता असं म्हणत तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल संताप व्यक्त केला आहे. आमदार तानाजी सावंत भूम येथे नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत बोलत होते, त्याचबरोबर गरज नसताना तुम्ही त्याला का घेतलं असं म्हणत माजी आमदार राहुल मोटे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केलेल्या प्रवेशाबद्दल सावंत संतापल्याचे दिसून आले,.
आणखी वाचा
Comments are closed.