नामांकन दाखल करण्याची मुदत एक दिवसावर, पण बुलढाण्यात एकाही पक्षाचा उमेदवार ठरेना, आज मोठ्या राज
बुलढाणा निवडणूक 2025: बुलढाणा जिल्ह्यातील अकरा नगर परिषदमध्ये होणाऱ्या निवडणुकांपूर्वी (Buldhan Nagar Parishad Election 2025) राजकीय वातावरण तापले आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत केवळ एका दिवसावर येऊन ठेपली असताना, अद्यापही कोणत्याही प्रमुख पक्षाने उमेदवारांची अंतिम यादी निश्चित केलेली नाही. नगराध्यक्ष पदाच्या दावेदारीवरून आतापर्यंत सर्वच पक्षांत मोठा गोंधळ दिसून येतोय. कोणाला तिकीट मिळणार, कोण बाहेर राहणार, कोण अपक्ष म्हणून मैदानात उतरणार? या चर्चांभोवतीच राजकीय हालचाली सुरू आहेत.
Buldhana Election 2025: महायुती आणि महाआघाडीत गोंधळ कायम
महायुती (Mahayuti) असो वा महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) दोन्हीकडे प्रभाग वाटप आणि उमेदवार निवडीवरून रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच काही स्थानिक आघाड्या व अपक्ष गटांने देखील मुख्य पक्षांची डोकेदुखी वाढवली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यातच काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, स्थानिक नेत्यांसोबत ते बैठका घेणार आहेत. त्यामुळे बुलढाण्यात आज दिवसभर राजकीय ढवळाढवळ दिसून येणार आहे.
Buldhana Election 2025: उद्यापासून नामांकन अर्ज स्वीकारले जाणार
उद्यापासून नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. मात्र अद्याप उमेदवारांची घोषणा न झाल्याने सर्वच पक्षांमध्ये घाई–गडबडीचे वातावरण आहे. आता महाविकास आघाडी आणि महायुतीतून कोणत्या उमेदवारांना संधी मिळणार आणि कोणाला डच्चू मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Buldhana Election 2025: बुलढाण्यातील 11 नगर परिषदमधील 2017 च्या निवडणूकीतील पक्षीय बलाबल
एकूण नगर परिषदा – 11
भाजपा नगराध्यक्ष – 05
काँग्रेस नगराध्यक्ष – 03
शिवसेना नगराध्यक्ष – 01
वंचित नगराध्यक्ष – 01
शहर विकास आघाडी नगराध्यक्ष – 01
Buldhana Election 2025: नगरसेवक पक्षीय बलाबल
भाजपा – 73. (भाजप)
काँग्रेस – 79. (Congress)
शिवसेना – 53. (शिवसेना)
राष्ट्रवादी – 20. (राष्ट्रवादी)
वंचित – ०४ (वंचित बहुजन आघाडी)
अपक्ष – 18. (Independent)
MIM – 05. (MIM)
स्थानिक आघाडी – 11.
Maharashtra Local Body Elections Timetable : असे असेल निवडणुकीचे टाईमटेबल
नामनिर्देशन पत्र – 10 नोव्हेंबर
अंतिम मुदत – 17 नोव्हेंबर
छाननी – 18 नोव्हेंबर
अर्ज माघारी घेण्याची तारीख – 21 नोव्हेंबर
निवडणूक चिन्ह वाटप – 26 नोव्हेंबर
मतदान – 2 डिसेंबर
निकाल – 3 डिसेंबर
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.