घरात दोघे भाऊ; वय वाढलेलं, लग्न जुळत नसल्याच्या संताप अन् मुलाचा बापासोबत वाद; वडीलाच्या डोक्या


भंडारा: भंडाऱ्याच्या आथली गावात मुलानं आपल्या वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक (Bhandara Crime News) घटना समोर आली आहे. मोठा भाऊ बिनालग्नाचा होता, लहान मुलाचंही वय वाढत चाललं होतं, तरीही वडिलांकडून लग्न लावून दिलं जात नसल्याच्या वादातून मुलाने वडिलांच्या डोक्यावर वीट  (Bhandara Crime News) घातल्याची घटना समोर आली आहे. यात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील आथली या गावात घडली आहे. शुक्रवारी (७नोव्हेंबर) रात्री ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. (Bhandara Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम कुंभलवार ( वय वर्षे ५७) असे मृताचे तर, प्रदीप पुरुषोत्तम कुंभलवार (३३) असे मुलाचे नाव आहे. पोलिसांनी घटना घडल्यानंतर काही तासांमध्येच खुनाच्या गुन्ह्याखाली मुलाला  (Bhandara Crime News) अटक केली आहे. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पभूधारक शेतकरी असलेल्या पुरुषोत्तम यांना दोन मुले आहेत. ते शेतकरी म्हणून काम करतात.

शुक्रवारी, रात्री ८ वाजता घरी जेवण झाल्यानंतर पुरुषोत्तम, त्याची पत्नी रेवता (५१) आणि धाकटा मुलगा प्रदीप घरात सगळे बोलत बसले होते. मोठा मुलगा प्रेमकुमार (३५) हा बाहेर गेला होता. या दरम्यान, प्रदीपने वडिलांसोबत वाद घातला. तुम्ही म्हातारे झाला आहात, आम्ही अजूनही अविवाहित आहोत. लग्न कधी लावून देणार?, असे विचारल्यावरून हा वाद वाढत गेला. रागाच्या भरात त्याने वडिलांच्या डोक्यात विट घेऊन वार केला. त्यामुळे रक्तस्त्राव होऊन ते बेशुद्ध  (Bhandara Crime News) पडले. पत्नी रेवता यांनी तत्काळ तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांना माहिती दिली, त्यांनी पुरुषोत्तमला रुग्णवाहिकेने लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. (Bhandara Crime News)

आणखी वाचा

Comments are closed.