महायुतीत नव्हे स्वबळावरच लढणार, शिंदे गटाच्या आमदाराचा निर्धार; पत्नीला निवडणुकीच्या आखाड्यात उ
जळगाव वार्ता: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Local Body Election) पार्श्वभूमीवर महायुतीऐवजी (Mahayuti) स्वबळावर निवडणूक लढविण्याचा नारा देत शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी आपली स्वतंत्र भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या पत्नी सुनीता पाटील (Sunita Patil) या पाचोरा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असून, त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात करण्यात आला.
शहरातील पहिला माता मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी आमदार किशोर पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. पाटील म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत जे आपल्याविरोधात लढले, जे आपल्या राजकीय कारकिर्दीत सतत विरोधक राहिले, त्यांच्या सोबत युती कशी करू शकतो? म्हणूनच आम्ही स्थानिक स्वराज्य निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
Kishor Patil: आम्हीच विजयी होऊ : किशोर पाटील
राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा देणारे शिंदे गटाचे हे पहिले आमदार ठरले असून, त्यामुळे राज्यभरात पाचोराकडे लक्ष वेधले गेले आहे. पाचोऱ्यात आ. किशोर पाटील यांची मतदारसंघात मजबूत पकड असल्याने महायुतीच्या उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. विशेष म्हणजे, भाजप पदाधिकारी असलेल्या आ. पाटील यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी या आपल्या वहिनीच्या विरोधात प्रचार करणार असल्याने ही निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आपल्या उमेदवारांच्या विजयाबाबत आत्मविश्वास व्यक्त करत “पाचोऱ्याच्या जनतेचा विश्वास आमच्यावर आहे, आणि आम्हीच विजयी होऊ,” असे देखील किशोर पाटील यांनी म्हटले आहे.
Kishor Patil on BJP: किशोर पाटलांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
दरम्यान, पाचोरा येथे झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या निर्धार मेळाव्यात आमदार किशोर पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. भाजपच्या बंडखोरांना पुन्हा पक्षात घेतल्याबद्दल त्यांनी भाजपवर सडकून टीका केली होती. “महायुतीच्या एक वर्षाच्या काळात आमदारांना एक फुटकी कवडीही मिळाली नाही,” असा टोला लगावत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला होता. “शिवसेनेच्या पाचही आमदारांनी ठरवलं, तर जळगाव जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा अध्यक्ष बसणार. भाजपचे नेते युतीबद्दल बोलतात पण हे कधी पलटी खातील, याचा भरोसा नाही,” असे देखील किशोर पाटील यांनी म्हटले होते. एकनाथ शिंदे यांच्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री काळात त्यांनी एक दिवसाच्या नायक चित्रपटातील मुख्यमंत्र्यासारखं काम केलं. आजपर्यंतच्या इतिहासातला पहिला मुख्यमंत्री मी पाहिला ते म्हणजे एकनाथ शिंदे यांना. प्रत्येक भगिनीला जर तुम्ही विचारलं तर तुझा लाडका भाऊ कोण तर सख्ख्या भावाच्या आधी लाडकी भगिनी सांगते की माझा लाडका भाऊ एकनाथ शिंदे आहे, असे म्हणत किशोर पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे यांचे कौतुक केले होते.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.