अंजली दमानियांना जीवे मारण्याची धमकी, गाडीत मोबाईल बंद ठेवा; अधिकाऱ्याचा फोन, दमानियांची पहिली


अंजली दमानिया: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. काही विश्वसनीय सूत्रांकडे ‘माझा गेम केला जाणार’  अशा गंभीर स्वरूपाचे इनपुट असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः फोन करून दमानिया यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही देण्यात आली असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी सिक्युरिटी नाकारली आहे.

Anjali Damania: “माझा गेम केला जाणार आहे.. “

अंजली दमानिया यांनी स्वतः याबाबतची माहिती देत सांगितले की,“मी अमेरिकेत असताना मला एका सीनियर अधिकाऱ्यांचा फोन आला. त्यांनी सांगितले की त्यांच्या हाताला काही इनपुट मिळाले आहेत की तुमचा गेम केला जाणार आहे. काही लोकांना वाटतंय की ‘यांचा अति होतोय, यांचा गेम करायचाच’, अशा प्रकारच्या चर्चा त्यांच्या कानावर आल्या आहेत.”

दमानिया पुढे म्हणाल्या, “मला सांगण्यात आलं की तुम्ही प्रवासादरम्यान गाड्या बदलून वापरा. गाडी चालवताना फोन बंद ठेवा. फोन स्विच ऑफ ठेवलात तर चांगलं. मला स्पष्टपणे सावध राहण्याचे निर्देश दिले गेले.”

मुख्यमंत्री फडणवीसांना दिली कल्पना

दमानिया यांनी सांगितले की, संबंधित अधिकाऱ्यांनी ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कळवली आहे. “या इशाऱ्याची गंभीरता लक्षात घेता त्यांनी ताबडतोब महाराष्ट्र सरकारला माहिती दिली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

अंजली दमानिया यांनी अजून एक महत्त्वाची बाब उघड केली,“सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी मिळाली त्या फोनच्या आदल्या दिवशीच मला हा इशारा मिळाला होता.” या सर्व परिस्थितीतही दमानिया यांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला आहे. त्या म्हणाल्या,“मला सिक्युरिटी घ्यायला सांगितलं आहे. मी एकदा नाही, दोनदा लिहून दिलं आहे की मला सिक्युरिटी नको आहे. मी सिक्युरिटी घेणार नाही. मी माझं काम सुरू ठेवणार.”

आणखी वाचा

Comments are closed.