साताऱ्यात दोन्ही राजेंचं मनोमिलन, शिवेंद्रराजेंचे संकेत, इच्छुक उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढणार


सातारा बातम्या : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या लोकांना बैठका, दौरे सुरु केले आहेत. अशातच सातारा जिल्ह्यात देखील घडामोडींना वेग आला  आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात दोन्ही राजेंचे मनोमिलन झालं आहे. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मनोमिलनावर केले शिक्कामोर्तब केला आहे. भाजपच्या कमळ चिन्हावरच दोन्ही राजेंचे इच्छुक उमेदवार पालिका निवडणूक लढवणार आहेत.

भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेण्यात आल्या

आज भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेण्यात आल्या. आजच्या मुलाखतीला भाजप आणि दोन्ही राजेंच्या दोन्ही आघाड्या एकत्र दिसल्या. या मुलाखती दरम्यान मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील या मुलाखतीचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांची बोलताना मंत्री शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट दोन्ही राजेंच्या मनोमिलनाबाबत संकेत दिले आहेत. मी आणि उदयनराजे भाजपा म्हणून एकत्र निवडणुका लढणार आहोत. यामध्ये आमच्या दोघांची कुठलीही वेगळी भूमिका नाही असे म्हणत मनोमिलन झाल्याचे स्पष्ट संकेत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले आहेत.

सातारा नगरपालिकेची निवडणूक भाजप आणि दोन्ही राजेंच्या आघाड्या एकत्र लढणार

एकंदरीत या संपूर्ण पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिका ही निवडणूक भाजप आणि दोन्ही राजेंच्या आघाड्या एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट झाल आहे. आजच्या मुलाखतीनंतर ज्यांनी ज्यांनी मुलाखती दिल्या आहेत त्यांची यादी मुंबईला जाऊन मुख्यमंत्री यांच्यासोबत जिल्ह्याची बैठक घेऊन यादी समोर मांडणार आहे. नेमकं भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री हे नगराध्यक्ष पद आणि, नगरसेवक पदाबाबतची यादी फायनल करतील, असं मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

आणखी वाचा

Comments are closed.