सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ, सोन्याचे दर वाढणार की घसरणार, सोनं खरेदी करावं की थांबावं?


सोन्याचा भाव मुंबई : सोने आणि चांदीच्या दरात सोमवारी मोठी तेजी पाहायला मिळाली. अमेरिकन डॉलरमध्ये कमजोरी आणि पुढील महिन्यात फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरात कपात होण्याची शक्यता असल्यानं गुंतवणूकदारांकडून पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत. आज दुपारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर  सोन्याचे दर 1.64 टक्क्यांनी वाढून 123057 रुपयांवर पोहोचले. तर, चांदीचा दर 2.66 टक्क्यांनी वाढून 151657 रुपयांवर पोहोचला आहे.

सोने आणि चांदीच्या दरात वाढ का होतेय?

जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि अमेरिकेत व्याज दरात घसरण होण्याची अपेक्षा असल्यानं बाजारात गुंतवणूकदारांकडून सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यात गुंतवणूक केली जाते. अमेरिकन डॉलर कमजोर होत असल्यानं सोने आणि चांदीचे दर कमी झाले. त्यामुळं आंतरराष्ट्रीय खरेदीदारांकडून मागणी वाढली आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेसंदर्भात चिंता असल्यानं गुंतवणूकदारांकडून सुरक्षित पर्याय म्हणून सोने आणि चांदीला प्राधान्य दिलं जात आहे.

गुंतवणूकदारांना काय करायला हवं?

बाजार जाणकारांच्या मते जागतिक अनिश्चितता आणि लग्नसराईमुळं येत्या काळात सोने आणि चांदीची मागणी वाढल्यानं दर आणखी वाढू शकतात. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा चांगला पर्याय आहे. मात्र, अल्पकालीन तेजी आणि घसरण लक्षात घेणं आवश्यक आहे. जाणकारांच्या मते खरेदी अगोदर सपोर्ट लेवल आणि बाजाराची दिशा पाहायला पाहिजे. ज्वेलर्सच्या मते लग्नसराई आणि सणांच्या काळात होसलेल मागणी वाढली आहे. ज्यामुळं दरांवर परिणाम पाहायला मिळेल.

सोने आणि चांदीचे दर कसे ठरतात?

सोने आणि चांदीचे दर आंतरराष्ट्रीय घटकांवर अवलंबून असतात. डॉलर- रुपया विनिमय दर म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे दर डॉलरमध्ये निश्चित होतात. रुपया कमजोर झाल्यास भारतात सोन्याचे दर वाढतात. भारतात बहुतांश सोने आयात केले जातं. ज्यामध्ये आयात शुल्क, जीएसटी आणि स्थानिक करांचा परिणाम सोन्याच्या दरांवर होतो. भारतात सोन्याची मागणी लग्नसराई किंवा सनांच्या निमित्तानं वाढते. कारण सोन्याला आर्थिकदृष्ट्या जसं महत्त्व आहे, तसंच ते सांस्कृतिकदृष्ट्या देखील आहे. महागाई जेव्हा वाढते किंवा शेअर बाजारात अस्थिरता असते तेव्हा गुंतवणूकदारांकडून सोन्यात सुरक्षित पर्याय म्हणून गुंतवणूक वाढवली जाते. ज्यामुळं सोन्याचे दर वाढतात.

दरम्यान, सोने आणि चांदीच्या दरात तेजी कायम आहे. कमी कालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी तेजी घसरण सुरु राहू शकते. मात्र, दीर्घकालीन गुंतवणूक आणि लग्नासाठी सोने खरेदी करणाऱ्यांनी विचारपूर्वक निर्णय घेत बाजाराच्या ट्रेंडवर लक्ष ठेवावं.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.