कुठे गेली छप्पन इंचाची छाती? किमान आता तरी जनाची नाही, मनाची लाज बाळगा..; काँग्रेसची सडकून टीका
दिल्ली बॉम्बस्फोटावर काँग्रेस दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 च्या परिसरातून जाणाऱ्या एका कारमध्ये (Delhi Car Blast) सोमवारी सायंकाळी सुमारे 6.52 वाजता भीषण स्फोट(Delhi Bomb Blast) झाला. देशाला हादरवणाऱ्या या स्फोटात 11 जणांना आपला जीव गमवावा लागला असून 15 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी सर्वत्र हाय अलर्ट जारी केला असून पोलिसांसह फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचल्या आहेत. तर या प्रकरणात आता धक्कादेणारा माहिती समोर येत आहे. दरम्यान याf आणि भ्याड हल्ल्यावरून काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
हे बेशरम लोक आहेत, हे राजीनामे देणार नाही. झोला घेऊन आलो, झोला घेऊन जातो, असे सांगणारे हे लोक आहे. त्यांना देशाशी देणंघेणं नाही. यांच्याकडून राजीनाम्याची अपेक्षा करण्यापेक्षा देश सुरक्षित कसा राहील, यावर स्पष्टीकरण द्यावे. केंद्र सरकारने दाखवलेलं स्वप्न भंग झाले. त्यामुळे आता त्यांनी जनाची नाही तर मनाची लाज ठेवावी, अशी बोचरी टीका नाना पटोले (Nana Patole) यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
Nana Patole : देशाच्या सुरक्षेचा प्रश्न, केंद्र सरकारचं हे फेल्यूअर
पंतप्रधान आणि गृहमंत्री देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केलाहे. नाना पटोले म्हणाले, ‘हे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि केंद्र सरकारचं हे फेल्यूअर आहे. केंद्र सरकारने याची जबाबदारी स्वीकारावी. त्यांनी या घटनेची तुलना मुंबईवरील हल्ल्याशी करत, त्यावेळी भाजपने केलेल्या राजकारणाची आठवण करून दिली.
Nana Patole : आता कुठे गेली छप्पन इंचाची छाती? नेमकं काय म्हणाले नाना पटोघ्या
आम्हीच करू शकतो अश्या पद्धतीने आश्वासन देऊन लोकांना मूर्ख बनवले, आता कश्मीर असुरक्षित आहे. छप्पन इंचाची छाती आता कुठे गेली? आम्हाला यात राजकारण करायचं नाही. पण दिल्लीत आणि केंद्रात यांचे सरकार असताना हे आतंकवादी या ठिकाणी आले कुठून? असा प्रश्न निर्माण होत आहे. नरेंद्र मोदींनी दिलेल्या खोटे आश्वासनाची पोलखोल आता झाली आहे. हा भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. असे नाना पटोले म्हणाले.
Nana Patole on Delhi Bomb Blast : हे केंद्राच अपयशत्याची जबाबदारी सरकारने स्वीकारावी
पुलवामा, पहेलगाम हल्ल्यावेळी आम्ही सरकारच्या सोबत होतो. पहेलगाम, पुलवामाच्या घटनेनंतर राजकारण केलं नाही. ऑपरेशन सिंदूरच्या नावावर शत्रू भारताकडे बघणार नाही, ही जी भूमिका मांडली होती. त्याच आता काय झालं, हे केंद्राच अपयश आहे आणि त्याची जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारावी.असेही नाना पटोघ्या म्हणाले. निवडणुका लढणे आणि पक्ष जिंकवणे अशा पद्धतीची त्यांची भूमिका भाजपची असते. देश हित आणि सुरक्षेबद्दल त्यांच्याजवळ कुठलाही प्लॅन नाही. गृहमंत्री बिहारमध्ये विना कॅमेरा एका हॉटेलमध्ये थांबले आहे, ते कशासाठी थांबले आहेत्यामुळे? कोणत्या लोकांना ते भेटत आहे? कुठलीही सुरक्षा न घेता विना कॅमेरा सीसीटीव्ही फुटेज बंद करून गृहमंत्री अमित शहा काय करत आहे? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहे. असेही ते म्हणाले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.