राष्ट्रवादी नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल, बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी का
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे ( Rupali Patil Thombre) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. बहिणीवर दाखल झालेल्या गुन्ह्याचा जाब विचारण्यासाठी रुपाली ठोंबरे खडक पोलिस ठाण्यात गेल्या होत्या. यावेळी त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्यासोबत अरेरावी करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर पोलिसांनी रूपाली पाटील ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रुपाली पाटील यांची बहीण आणि इतर तीन जणावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यांतर त्या चांगल्याच संतापल्या होत्या. रुपाली पाटील यांनी पोलीस स्थानकात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्यासोबत अरेरावी करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्या पोलिसांवरही संतापल्या होत्या. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुणे राष्ट्रवादी कांग्रेसचे नेत्या रुपाली पाटील यांची बहीण आणि इतर तीन जणावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माधवी खंडाळकर या महिलेने रुपाली पाटील यांच्यावर पोस्ट लिहिली होती. याचा राग मनात धरून रुपाली पाटील यांच्या बहिणीने मला मारहाण केल्याचा व्हिडीओ माधवी खंडाळकर हिने व्हायरल केला होता. मात्र नंतर तिने आमच्यात गैरसमज झाले आणि त्यातून हे झाल्याच म्हटल होत. मात्र काल माधवी खंडाळकर हिने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर रुपाली पाटील यांच्या बहिणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या नंतर रुपाली पाटील यांच्या बहिणीने पण तक्रार दाखल केली आणि माधवी खंडाळकर हिच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. या सगळ्यांमध्ये चाकणकर असल्याचा आरोप रुपाली पाटील यांनी केला आहे.
माधवी खंडाळकरने काय केल होत ?
रुपाली पाटील यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. नंतर ती डिलीट करण्यात आली. मात्र त्या बदल्यात रुपाली पाटील यांच्या बहिणीने माझ्यावर हल्ला केला असा आरोप खंडाळकर यांनी केला. माझा आणि रुपाली चाकणकर यांचा संबंध नाही, मी माझ्या वरील हल्ल्याससाठी न्याय मागत आहे. मला वेळ पडली तर मी राज्य महिला आयोगात जाईन अस खंडाळकर यांनी म्हटल आहे.
आणखी वाचा
Comments are closed.