पक्षाने आम्हाला कोललं तर आम्हीदेखील पक्षाला कोलल्याशिवाय राहणार नाही, पुण्यातील नेत्याचा अजितदा


इंदापूर: पक्षाने आम्हाला कोललं तर आम्ही देखील कोलल्याशिवाय राहणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकरांचा इंदापुरातून गर्भित इशारा दिला आहे. इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदावरून इंदापुरात राजकारण तापलं असल्याचं दिसून येत आहे. जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसह कृषिमंत्री भरणे यांना इशारा थेट दिला आहे. इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून इंदापुरात मोठा पेच प्रसंग निर्माण झाला आहे. इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात घेऊन राष्ट्रवादीच्या चिन्हावर उमेदवारी देण्यास जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर समर्थकांनी प्रचंड विरोध दर्शवला आहे.

Ajit Pawar NCP: गारटकर यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली

जर पक्षाने गारटकर समर्थक विरोधी भूमिका घेतली तर मात्र इंदापूरमध्ये प्रदीप गारटकर आपल्या पदाचा राजीनामा देऊन पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. आज पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत या संदर्भात झालेल्या चर्चेनंतर सायंकाळी इंदापूर शहरातील गारटकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आणि या बैठकीत गारटकर यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. जर पक्षाने आपल्या विरोधी निर्णय घेतला तर स्थानिक आघाडी करून निवडणुकीच्या आखाड्यात उतरू, उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघू आणि राजीनामा देऊ. जर पक्षाने आमचं ऐकलं, योग्य सन्मान ठेवला तर आम्ही घड्याळावरती आहोत, पक्षाने जर आम्हाला कोलल तर आम्ही सुद्धा पक्षाला कोलल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशाराच इंदापुरातून जिल्हाध्यक्ष गारटकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह  इंदापूरचे आमदार राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिला आहे.

Ajit Pawar NCP: माझी सगळ्यांशी बोलणी सुरू आहे

आपण आपली ताकद आणि उद्या आपल्या बरोबर येणाऱ्या लोकांची ताकद एकत्र मिसळली तर या शहरांमध्ये एकतर्फी निवडणूक होऊन जाईल. एवढी मी तुम्हाला खात्री देतो. या दृष्टीने माझी सगळ्यांशी बोलणी सुरू आहे. त्या पद्धतीने लोक आपल्या विचाराला आपल्याला पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यांनी पाठिंबा देत असताना त्यांचा काय म्हणणं आहे ते मला फक्त ऐकून घ्यायचं आहे. ते मी ऐकून घेतो आणि त्यामध्ये सन्मानाने मार्ग काढून सगळे मिळून एकत्रित पॅनल उभा करूयात. हे त्यांनाही मी सांगितलं आहे. याआधी पक्षासाठी प्रायोरिटी आहे. पक्षाने जर आमचा ऐकलं पक्षाने जर योग्य सन्मान ठेवला तर आम्ही घड्याळावरती आहे. जर पक्षाने आम्हाला कोललं तर आम्ही सुद्धा पक्षाला कोलल्याशिवाय राहणार आहे. हे सांगून टाकलं आहे माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा उद्याच्या शेवटच्या तारखेला फॉर्म भरण्याच्या दोन दिवस आधी त्यादिवशी पर्यंत त्या गोष्टीची वाट बघू. त्यानंतर मी निर्णय घेईल, पक्ष आपल्या निर्णयाच्या विरोधात जर काही करत असेल, तर मग मी माझी नैतिकता ओळखतो मला ती सांभाळायची माहिती आहे उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघू आणि राजीनामा देईल असंही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर त्यांनी म्हटलं आहे

आणखी वाचा

Comments are closed.