काँग्रेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार, मुंबईतील शिबिरात मोठी घोषणा


मुंबई महानगरपालिका निवडणूक 2025 मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत (Mumbai Municipal Corporation Election 2025) काँग्रेसने ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. आजच्या मुंबई काँग्रेसच्या (Mumbai Congress) एकदिवसीय शिबिरात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी घोषणा केली आहे.

काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी स्वतंत्र पालिका निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय घेतल्याची रमेश चेन्नीथाला यांनी सांगितले. मुंबईच्या पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी किंवा इतर कोणासोबत न जाण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

वर्षा गायकवाड काय म्हणाल्या? (Varsha Gaikwad On BMC Election)

मुंबई काँग्रेसच्या वतीने ही निवडणूक स्वबळावर लढली पाहिजे, हे आम्ही मांडलं.राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार यांच्यासोबत आम्ही युती कायम राहिली आहे, त्यांच्याशीही आम्ही बोलणार आहोत, असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.

मनसेला महाविकास आघाडीत सहभागी करुन घेण्यास काँग्रेसचा होता विरोध- (Congress BMC Election 2025)

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची (Local Body Election) रणधुमाळी सुरु झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकत्र येणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र काँग्रेसने (Congress) मनसेला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्यास विरोध दर्शविल्याचे याआधी दिसून आले होते. त्यामुळे निवडणुकीत मनसे आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) एकत्र निवडणूक लढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच आता आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे.

मनसेकडून जवळपास सव्वाशे जागांची यादी तयार- (MNS ON BMC Election 2025)

मनसेकडून जवळपास मुंबईतील 227 पैकी 125 जागांची यादी काढण्यात आली आहे. ज्यामध्ये मनसेकडे चांगले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार आहेत. यामध्ये बहुतांश माहीम, दादर, परळ, लालबाग, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, जोगेश्वरी या मराठी मतदार मोठ्या संख्येने असलेल्या जागांचा समावेश आहे. जागावाटपाच्या चर्चेआधी मनसेकडून जवळपास सव्वाशे जागांची यादी तयार करण्यात आली आहे. युती झाल्यास यामध्ये मनसे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेला किती जागा मिळणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी दोन्ही पक्षांकडून आपली ताकद असलेल्या जागा या बाजूला काढल्या जात आहेत. 11 नोव्हेंबरला आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने जागा वाटपाची चर्चा ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. जागा वाटपाचे कुठलेही सूत्र अद्याप ठरलेलं नसलं तरी मेरीटनुसार हे जागावाटप होईल, अशी सूत्रांची माहिती आहे.

संबंधित बातमी:

BMC Election 2025 Uddhav Thackeray मराठी: देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंचे किती नगरसेवक?; A टू Z माहिती

आणखी वाचा

Comments are closed.